भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत चार सामन्यांच्या टी20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना आज (15 नोव्हेंबर) जोहान्सबर्ग येथे खेळवला जाणार आहे. ही मालिका चार सामन्यांची असल्याने टीम इंडिया आता मालिका गमावू शकत नाही. पण ती अनिर्णित नक्कीच होऊ शकते. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने 11 धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला होता. ज्यामध्ये भारताने रमणदीप सिंगला पदार्पणाची संधी दिली होती. शेवटच्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये टीम इंडियाचे व्यवस्थापन किती बदल करू शकते हे जाणून घेऊया.
सर्वप्रथम, खेळपट्टीचे स्वरूप पाहिल्यास, टी20 सामन्यांमध्ये जोहान्सबर्गची खेळपट्टी सपाट असु शकते. जिथे चेंडू थेट बॅटवर येतो. याच कारणामुळे या मैदानावर अनेक वेळा एका डावात 200 किंवा त्याहून अधिक धावा झाल्या आहेत. या स्टेडियममधील सर्वोच्च धावसंख्या 260 धावांची आहे. जी श्रीलंकेने केनियाविरुद्ध केली होती. अशा स्थितीत, दोन्ही संघांना त्यांच्या फलंदाजीत सखोलता हवी आहे. दुसरीकडे वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळणे अपेक्षित आहे. परंतु त्यानंतर फिरकी गोलंदाजी खेळपट्टीवरून प्रभावी ठरू शकते.
जोहान्सबर्गमधील द वांडरर्स मैदानाचा इतिहास असे सुचवतो की किमान तीन वेगवान गोलंदाजांसह खेळणे ही एक आदर्श रणनीती ठरू शकते. अशा परिस्थितीत टीम इंडिया एका फिरकी गोलंदाजाला वगळून प्लेइंग इलेव्हनमध्ये अतिरिक्त वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्याची शक्यता आहे. गेल्या सामन्यात गोलंदाजी न करणाऱ्या रमणदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे.
रमणदीपच्या जागी यश दयाल, विजयकुमार वैशाक किंवा आवेश खान येऊ शकतात. अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजीची कमान घेऊ शकतात. या मालिकेतील पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने शतक झळकावले होते. मात्र त्यानंतर तो दोन्ही डावात शून्य धावांवर बाद झाला. तरीही यष्टिरक्षक म्हणून जितेश शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची फारशी आशा नाही.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, विजयकुमार वैशाक, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई
हेही वाचा-
‘किंग आता त्या ठिकाणी आला आहे जिथे… ‘, विराट कोहलीबाबत रवी शास्त्रींचा अंदाज
बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी भारताची डोकेदुखी वाढली! स्टार फलंदाज दुखापती
“प्रत्येक विकेट तुम्हाला समर्पित…”, पुनरागमनानंतर मोहम्मद शमी भावूक, पहिली प्रतिक्रिया समोर