---Advertisement---

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेतच पावासाचं सावट? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोलंबोमधील हवामान कसे असेल

On: शुक्रवार, ऑगस्ट 2, 2024 12:09 PM
---Advertisement---

टी20 मालिकेत भारताने श्रीलंकेचा पराभव केला. यानंतर आता भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची द्विपक्षीय वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 2 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे आणि उपकर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे असेल. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिली एकदिवसीय मालिका असेल, ज्यामध्ये भारताने ही मालिका जिंकवण्यासाठी ते इच्छुक असतील. मात्र, पहिल्या सामन्यात कोलंबोचे हवामान चांगले दिसत नाही.

हवामान खात्यानुसार, शुक्रवारी पहाटे 2 ते 3 या वेळेत कोलंबोमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता होती. तसेच, दुपारी 3 वाजेपर्यंत पाऊस पडणार नाही, परंतु दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. या कालावधीत पावसाची पातळी 50 टक्क्यांहून अधिक असेल. हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे. आर्द्रता पातळी 80 ते 85 टक्के राहील आणि तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

दोन्ही संघातील हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाल्यास तर, टीम इंडियाचा श्रीलंकेवर दबदबा असल्याचे दिसते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 246 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 142 सामने जिंकले आहेत तर श्रीलंकेने 73 सामने जिंकले आहेत. ज्यामध्ये 2 सामने बरोबरीत, 17 अनिर्णित राहिले आणि 12 सामने अनिर्णित ठरले.

भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. तर भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

भारत विरुद्ध श्रीलंका पूर्ण संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा

श्रीलंका : चारिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सादिरा समराविक्रमा, कामिंदू मेंडिस, झेनिथ लियानागे, निशान मदुष्का, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलागे, चमिका करुणारत्ने, महिष टेकनशान, अकिला तिखाना, मदनशान, मदिरा हसरांगा. असिथा फर्नांडो

हेही वाचा-

मोठी बातमी! ऑलिम्पिक दरम्यान भारतीय खेळाडूचा पॅरिसमध्ये कार अपघात, कुटुंबीयही होते सोबत
चॅम्पियन्स ट्राॅफीची पायाभरणी! श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेला आजपासून सुरुवात, रोहित-विराट जोडी पुन्हा ॲक्शनमध्ये
टी20 मालिकेच्या परभावनंतर श्रीलंका करणार कमबॅक! पाहा यजमान संघाला घरच्या मैदानावर हरवणे किती कठीण?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---