भारत आणि श्रीलंकेमधील पहिला एकदिवसीय सामना टाय झाला. श्रीलंका संघाने भारताला 231 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ एकदम मजबूत स्थितीत होता. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी आपली सर्व ताकद लावली अन् सामन्यात कमबॅक केलं. भारताला विजयासाठी 14 चेंडूत 1 धावाची गरज होती. तराही सामना टाय झाला. श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकाने दोन सलग दोन चेंडूत शिवम दुबे आणि अर्शदीप सिंहची विकेट घेत सामना टाय केला. पण त्याच्यासोबतच एक असा 21 वर्षाचा खेळाडू ज्यानं सुरुवातीलाच सामना भारताला विजयापासून लांबवला आणि अखेर सामना बरोबरीत सुटला.
हा 21 वर्षाचा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून दुनिथ वेल्लालगे आहे. ज्यावेळी श्रीलंका संघाच्या एकापाठोपाठ विकेट जात होत्या. त्यावेळी या प्रतिभावान खेळाडूने संघाचा एक टोक सांभाळून ठेवत निर्णायक खेळी करुन परतला. भारताच्या एकाही गोलंदाजाला शेवटपर्यंत आपली विकेट न देता त्यानं धावा केल्या. वेल्लालगेने 65 बॉलमध्ये 67 धावा केल्या, यामध्ये त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले.
तर गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने शानदार गोलंदाजी करत श्रीलंकेला सामन्यात खेचले. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल मजबूत स्थितीत फलंदाजी करत असताना मोक्याचे वेळी वेल्लालगेने 5 धावांच्या अंतरावर सलामीवीर फलंदाजांना तंबूत पाठवले. टीम इंडियाची धावसंख्या 75 असताना त्याने शुबमन गिलची (16) विकेट घेतली. त्यानंतर शानदार लयीत फलंदाजी करतल असेल्या हिटमॅन रोहितला (58) देखील या फिरकीपटूने झेलबाद केले. ज्यामुळे भारतीय संघाच्या हातातील सामना निसटला शेवटी सामना टाय झाला. महत्वाचे म्हणजे की, जर दुनिथ वेल्लालगेने पहिल्या डावात टिकून राहत फलंदाजी केली नसती तर श्रीलंकेला 230 धावांचा टप्पा गाठता आला नसता. त्यामुळे चरिथ असालंकाच्या दोन विकेट जितक्या महत्त्वाच्या होत्या त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची खेळी वेल्लालगे याने केली परिणामी या स्टार खेळाडूला सामन्यातील केलेल्या शानदार कामगिरीमुळे ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आले.
हेही वाचा-
लक्ष्य सेनची ‘लक्षवेधी’ कामगिरी, ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात असं करणारा पहिलाच भारतीय!
जिंकता-जिंकता गंडली टीम इंडिया, असलंकानं 2 चेंडूत केला गेम; भारत-श्रीलंका सामन्याचा अनपेक्षित निकाल
ओपनर रोहितचा भीम पराक्रम! सचिन-सेहवागच्या खास क्लबमध्ये केली एंट्री