भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना उद्या (27 जुलै) संध्याकाळी 7 वाजता पल्लेकेले येथे खेळवला जाईल. टीम इंडियाचे असे 3 खेळाडू आहेत ज्यांना श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातून बाहेर बसावे लागू शकते. या तीन खेळाडूंना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे खूप कठीण आहे.
रियान पराग
रियान पराग श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात खेळू शकणार नाही. शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग आणि शिवम दुबे हे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अशा परिस्थितीत रियान परागसाठी फलंदाजीच्या क्रमवारीत जागा मिळणे अवघड आहे. असो, झिम्बाब्वेविरुद्धच्या शेवटच्या टी20 मालिकेत रियान परागची कामगिरी खूपच खराब होती, त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल असे वाटत नाही.
संजू सॅमसन
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन अत्यंत स्फोटक शैलीत फलंदाजी करतो. पण श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात तो खेळू शकणार नाही. टीम इंडियामध्ये अनेक महान क्रिकेटर्स आहेत, जे संजू सॅमसनपेक्षाही सरस आहेत. याशिवाय यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत टीम मॅनेजमेंटची पहिली पसंती आहे. अशा परिस्थितीत संजू सॅमसनला एक विशेषज्ञ फलंदाज म्हणूनही श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात खेळणे कठीण आहे. अशा स्थितीत संघ व्यवस्थापन संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देणार का हे पाहणे म्हत्तवाचे राहील.
वॉशिंग्टन सुंदर
फिरकीपटू अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाकडून खेळण्याची कमीच आहे. संघ व्यवस्थापन फिरकी विभागात अक्षर पटेल आणि लेगस्पिनर रवी बिश्नोई यांना प्रथम प्राधान्य देईल. अशा स्थितीत वॉशिंग्टन सुंदरला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग बनणे कठीण होईल. अक्षर पटेल एक उत्कृष्ट क्रिकेटर आहे, जो फलंदाजी आणि गोलंदाजीने टीम इंडियाला मजबूत करेल. त्याचवेळी रवी बिश्नोई हा वॉशिंग्टन सुंदरपेक्षाही अधिक घातक फिरकी गोलंदाज आहे.
हेही वाचा-
भारताची मान उंचावली! तिरंदाजांनी पदकाच्या दिशेने घेतली झेप..
Asia Cup 2024: सेमीफायनल सामन्यापूर्वी भारताच्या स्टार खेळाडूनं केलं मोठं वक्तव्य!
श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने केले दुर्लक्षित, आता ऋतुराज गायकवाड बनला ‘या’ संघाचा कर्णधार