---Advertisement---

गौतम गंभीरने दाखवली विराटच्या फलंदाजीतील चूक, सांगितलं कशामुळे हुकतेय शतकाची संधी

On: शनिवार, मार्च 5, 2022 6:31 PM
Virat-Kohli-Gautam-Gambhir
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ४५ धावा करून बाद झाला. विराटने या सामन्यात मोठी खेळी करणे अपेक्षित होते, कारण हा त्याच्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना आहे. विराटने डावची सुरुवात चांगली केली, पण शतक करण्यापासून पुन्हा एकदा चुकला आहे. विराट बाद झाल्यानंतर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर (Goutam Gambhir) याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

विराटने विकेट गमावल्यानंतर गंभीर जोर देऊन म्हणाला की, जेव्हा फिरकी गोलंदाजांचा सामना करण्याची वेळ येते, तेव्हा विराटसहीत सर्व भारतीय फलंदाजांपुढे अडचण निर्माण होते.

स्टार स्पोर्टवर बोलताना गंभीर म्हणाला की, “सर्वात मोठी चिंतेची गोष्ट ही आहे की, बॅट पॅडच्या रेषेत आहे. जेव्हा असे असते, तेव्हा असा चेंडू खेळणे अवघड होऊन बसते, जो वळतो आणि जो वळत नाही. जर तुम्ही बॅटला पॅडच्या पुढे ठेवले, तर चेंडू केवळ तुमच्या बॅटच्या कडा लागतो. मयंक अगरवाल ज्याप्रकारे बाद झाला, ते पाहिले, तर चेंडू त्याच्या बॅटच्या आतल्या बाजूला लागला. पण विराट कोहलीच्या बाबतीत चेंडूने बॅटचा बाहेरची कड घेतली. त्यामुळेच तुमची बॅट पॅडच्या पुढे पाहिजे.”

गंभीरच्या मते भारतीय खेळाडू वेगवान गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सराव जास्त करत आहे, तसेच मर्यादित षटकांचे सामने जास्त खेळले जात आहेत. याच कारणास्तव खेळाडू क्रिकेटच्या मुळतंत्रापासून लांब होत आहेत. पुढे बोलताना गंभीर म्हणाला की, “हे शक्यतो सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये शिकवले जाते. आजकाल तुम्ही मर्यादित षटकांचे क्रिकेट एवढे खेळत आहात की, तुम्ही तुमच्या मुळ गोष्टींना विसरक चालले आहात. चांगल्या सवयी संपत चालल्या आहेत. तुम्ही वेगवान गोलंदाजीवर खूप लक्ष दिले आहे, त्यामुळे मला असे वाटते की, भारतीय फलंदाजांना फिरकीचा सामना करण्यासाठी सराव करण्याची गरज आहे.”

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने ४३ षटकात ४ बाद १०८ धावा केल्या. भारताने पहिला डाव १२९.२ षटकात ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला आहे. भारताकडून रविंद्र जडेजाने १७५ धावांची खेळी केली, तर रिषभ पंतने ९६ धावांची खेळी केली.

महत्वाच्या बातम्या –

“रोहितला गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीचा पुनरावृत्ती करण्याची गरज”

विराट की स्मिथ? शेन वॉर्नने सांगितलं होतं उत्कृष्ट कसोटी फलंदाज कोण ते…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---