Ashish Nehra On Coach Gautam Gambhir :-भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा वनडे सामना (IND vs SL Second ODI) कोलंबो मैदानावर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने भारताचा 32 धावांनी पराभव केला. श्रीलंकेचा उत्कृष्ट फिरकीपटू जेफ्री वँडरसे याने भारतीय फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही. त्याने श्रीलंकेसाठी गोलंदाजी करताना 6 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आणि श्रीलंकेला सामना जिंकून दिला. भारतीय संघाच्या या खराब कामगिरीनंतर माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा (Ashish Nehra) याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) याच्या रणनितीवर टीका केली आहे.
दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर बोलताना आशिष नेहरा याने गंभीर याच्या रणनितीविषयी बोलताना म्हटले, “भारताची पुढची मालिका दोन-तीन महिन्यानंतर आहे. त्यामुळे या मालिकेत युवा खेळाडूंना आजमावण्याचा प्रयत्न करण्यात यायला हवा होता. गंभीर नवा प्रशिक्षक आहे. त्याला अनुभवी खेळाडूंसोबत वेळ घालवायचा असेल म्हणून त्याने हा निर्णय घेतला असावा. मात्र, गंभीर कोणी विदेशी नाही. तो या खेळाडूंना आधीपासूनच ओळखतो. त्याचा हा निर्णय मी पूर्णतः चुकीचा मानत नाही. मात्र, त्याने रोहित-विराटला खेळवायला घाई करायला नको होती. वेगळे काही करता येऊ शकत होते.”
दुसऱ्या सामन्याचा विचार केल्यास, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 240 धावा केल्या. सलामीवीर अविष्का फर्नांडोने 62 चेंडूत 40 धावांची खेळी केली. कामिंदू मेंडिसने देखील 40 धावा केल्या. भारतासाठी गोलंदाजी करताना फिरकीपटू वाॅशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेनं दिलेल्या 241 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 10 गडी गमावून 208 धावाच करु शकला. भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने 44 चेंडूत सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. त्यामध्ये त्यानने 6 चौकारांसह 4 षटकार ठोकले. अक्षर पटेल याने 44 धावा केल्या. मात्र, जेफ्री वेंडरसेने 6 बळी मिळवत, भारताला पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SL भारताविरुद्ध कहर केलेल्या फिरकी गोलंदाजानं केला मोठा खुलासा, म्हणाला…
टेबल टेनिसमध्ये भारताचा धमाका, महिला संघ क्वार्टरफायनलमध्ये दाखल…!
3 भारतीय खेळाडू, ज्यांना श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग 11 मधून बाहेर करण्यात यावं