भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना कोलंबो येथे खेळला गेला. रोमांचक सामन्यात आखेर सामना टाय झाला. श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण टीम इंडियाला सर्वबाद होईपर्यंत केवळ 230 धावा करता आल्या. आता दोन्ही संघांमधील दुसरा वनडे रविवारी (04 ऑगस्ट) खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताला काही गोष्टींची विशेष काळजी (सराव) घ्यावी लागणार आहे. कोलंबोच्या खेळपट्टीवर फिरकीसाठी तयार राहावे लागेल.
पहिल्या वनडेत श्रीलंकेने भारताला 230 धावांवर ऑल आऊट केले. टीम इंडियाच्या बहुतेक फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध आऊट झाले. यासोबतच कोलंबोच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे थोडे आव्हानात्मकच वाटत होते. यासाठी भारतीय खेळाडूंना पूर्ण तयारी करावी लागणार आहे. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाने 3 बळी घेतले. त्याने विराट कोहलीला वैयक्तिक 24 धावांवर बाद केले. यासह केएल राहुल 31 धावा काढून बाद झाला. हसरंगानेही कुलदीप यादवची विकेट घेतली. पण तत्तपूर्वी आनंदाची बातमी म्हणजे वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे बाकी राहिलेल्या दोन वनडे सामन्यातून बाहेर पडला आहे.
टीम इंडियाच्या पहिल्या मॅचच्या इनिंगवर नजर टाकली तर पाच खेळाडू एलबीडब्ल्यू आऊट झाले होते. कर्णधार रोहित शर्मा, कोहली, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे आणि अर्शदीप सिंग त्याच पद्धतीने पॅव्हेलियनमध्ये परतले. भारताला विजयासाठी फक्त 1 धावांची गरज होती. यावेळी अर्शदीप शेवटच्या फलंदाजीला आला पण पहिल्याच चेंडूवर तो षटकार खेचण्याच्या प्रयत्नात एलबीडब्ल्यू आऊट झाला. एकूणच कोलंबोमधील खेळपट्टीचा विचार करता, टीम इंडियाला फिरकीपटूंविरुद्ध सावध फलंदाजी करावी लागेल.
भारताने श्रीलंकेचा टी20 मालिकेत 3-0 ने पराभव केला होता. मात्र वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. यामध्ये श्रीलंकेने टीम इंडियाला कडवी टक्कर दिली. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी होणार आहे. यानंतर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी होणार आहे. टीम इंडिया दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल करू शकते.
हेही वाचा-
IND VS SL: दुसऱ्या वनडेपूर्वी संघाला मोठा, स्टार ऑलराउंडर दुखापतीमुळे मालिकेबाहेर
आंतरराष्ट्रीयच नाही तर प्रथम श्रेणी क्रिकटमध्येही ‘हा’ खेळाडू आहे बादशाह!
भारतीय क्रिकेटपटूंना लवकरच मिळणार मोठे गिफ्ट, बीसीसीआय सचिव जय शहा यांची घोषणा