---Advertisement---

कुलदीपनंतर आता ‘या’ गोलंदाजाचे कसोटीतील स्थान धोक्यात? दुसऱ्या सामन्यातून मिळू शकतो डच्चू

On: बुधवार, मार्च 9, 2022 5:59 PM
Team-India
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) संघांमध्ये सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पहिली कसोटी मोहाली येथे पार पडली, तर दुसरी दिवस-रात्र कसोटी बॅंगलोरमध्ये खेळवली जाणार आहे. भारताने श्रीलंकेविरुद्धचा पहिली कसोटी १ डाव आणि २२२ धावांनी जिंकली. दुसरी कसोटी दिवस-रात्र असल्याने ती खास असणार आहे. आता १२ मार्चला सुरू होणारा हा सामना जिंकण्याच्या दृष्टीने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. हा कसोटी सामना विश्व कसोटी चॅम्पियनशीपचा भाग आहे,  त्यामुळे भारताला हा सामने जिंकणे गरजेचे आहे. 

दूसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय कसोटी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो. सध्या कुलदीप यादवला संघातून वगळण्यात आले आहे. त्यानंतर आता भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जयंत यादवचे भारतीय संघातील स्थान धोक्यात आले आहे. मोहालीतील खेळपट्टीवर अश्विन आणि जडेजाला एवढ्या विकेट मिळाल्या, परंतु जयंत यादवला एकही विकेट मिळाली नाही.

सामन्याच्या पहिल्या डावात जयंतने ६ षटकात १५ धावा दिल्या, परंतु एकही विकेट घेतली नाही आणि दूसऱ्या डावाच्या ११ षटकांत २१ धावा देत त्याने एकही विकेट घेतलेली नाही. आता दूसऱ्या कसोटीत जडेजा आणि अश्विन खेळताना दिसणार आहेत. परंतु जयंत यादवच्या जागी अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते. दुसऱ्या कसोटीत संघात हा मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

दरम्यान भारतीय संघाने पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. भारताच्या दोन गोलंदाजांनी मोठे विक्रम केले आहेत. रविंद्र जडेजाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीतही उत्तम कामगिरी केली आहे. त्याने भारताच्या फलंदाजीच्या पहिल्या डावात १७५ धावा केल्या आहेत, तसेच त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ विकेट घेतल्या आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज आर अश्विनने कपिल देवचा विक्रम मोडत ४३५ विकेट्सचा आकडा गाठला आहे. कपिल देव यांनी त्याच्या कसोटी कारकिर्दीत ४३३ विकेट घेतल्या होत्या. आर अश्विन आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दूसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर अनिल कुंबळे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

‘विराट कोहली जेव्हा मैदानावर असतो, तेव्हा त्याला वाटते की तोच राजा आहे’

वॉर्न सचिनच्या घरी गेला पण खाऊ शकला नव्हता चिकन, मग काय स्वत:च बनवली डीश, वाचा किस्सा

साक्षी धोनीने सांगितली बड्या क्रिकेटरसोबत लग्न केल्यानंतरची आव्हाने; म्हणाली, ‘प्रायवेट स्पेसच उरत नाही’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---