श्रीलंकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर (Sri Lanka Tour Of India) असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका (2 Matches Test Series) खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना (Mohali Test) मोहालीच्या मैदानावर पार पडला असून भारताने एक डाव आणि २२२ धावांच्या फरकाने जिंकला आहे. हा सामना जिंकत भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना १२ ते १६ मार्च दरम्यान होणार आहे. हा सामना बंगळुरूच्या मैदानावर होणार असून दिवस-रात्र (Second Test) स्वरूपात खेळला जाईल.
तत्पूर्वी सोमवारी (०७ मार्च) भारतीय संघ व्यवस्थापनाने त्यांच्या ताफ्यात मोठा बदल केला असून चायनामन कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला संघातून बाहेर (Kuldeep Yadav Released From Test Squad) केले आहे.
कुलदीप भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. हा फिरकीपटू पूर्णपणे फिट (Kuldeep YadavTotally Fit) आहे. तरीही त्याला संघातून वगळले गेले आहे. त्यामुळे नेमके संघ व्यवस्थापकांनी कुलदीपची कसोटी संघातून सुट्टी का केली?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
खरे तर, फिरकी अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) याला संघात सहभागी करण्यासाठी कुलदीपला बाहेर बसवले गेले आहे. अक्षर पटेल मागच्या काही काळापासून दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. आता तो दुखापतीतून सावरला आहे आणि संघात पुनरागमन (Axar Patel Comeback)केले आहे. अक्षरच्या जागी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ला संधी दिली गेली होती. पण आता अक्षरचे पुनरागमन झाल्यानंतर त्याला संघातून बाहेर जावे लागले आहे.
क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार अक्षर दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे आणि संघासोबत सामील झाला आहे. माहितीनुसार अक्षर मोहालीमध्ये कसोटी सामना सुरू असतानाच संघासोबत जोडला गेला आहे. कुलदीपला आता संघातून रिलीज केले गेले आहे. संघ व्यवस्थापनाच्या मते आता संघात दोन डावखुरे फिरकी गोलंदाज झाले आहेत, अशात कुलदीपची गरज उरलेली नाही. १८ सदस्यीय संघात रविचंद्रन अश्विन आणि जयंत यादव या फिरकी गोलंदाजांचाही समावेश आहे. तसेच रविंद्र जडेजाची फिरकी गोलंदाजी करतो.
भारताचा कसोटी संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाल, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाचा स्मिथ ठरला सचिनला वरचढ! १५० कसोटी डावांत केलाय कोणालाही न जमलेला पराक्रम
‘त्या’ सीनियर पीच क्यूरेटरवरचे आरोप ठरले खरे; शास्त्रींविरोधात जाऊन सोडली होती ऑर्डर