मागील वर्षी भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याबाबत आता एक मोठा खुलासा झाला आहे. माध्यमांमध्ये असे वृत्त आहे की, सामना होणाऱ्या खेळपट्टीबाबात मुख्य क्यूरेटरने छेडछाड केली होती. त्यामुळे देशांतर्गत संघाची सामन्यासाठीची योजना अयशस्वी झाली होती.
माध्यमांतील वृत्तांनुसार, पहिल्या कसोटीदरम्यान खेळपट्टीबाबात संघ व्यवस्थापनाने एक दिवस अगोदर पाणी देणे आणि रोलरचा वापर करण्यासाठी नकार दिला होता. मात्र, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण (Bharat Arun) हे तिथून गेल्यानंतर क्यूरेटरने ग्राउंड्समॅनला सांगितले की, त्याला उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, खेळपट्टीला पाणी द्यायचे आहे आणि रोलिंगही करायची आहे.
वृत्तांमध्ये असेही सांगितले आहे की, रवी शास्त्री आणि भरत अरुण इंग्लंडविरुद्धची कसोटी सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी ४ फेब्रुवारीला संध्याकाळी चिदंबरम स्टेडियममध्ये होते. मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षकाने क्यूरेटर आणि ग्राउंड्समॅनला स्पष्टपणे सांगितले होते की, खेळपट्टी जशी आहे, तशीच सोडा. तसेच, पाणी आणि रोलरचा वापर करू नका.
सर्व गोष्टी स्पष्ट करून ते संघातील बाकी सदस्यांबरोबर स्टेडियम सोडून निघून गेले होते. क्यूरेटरने खेळपट्टीला व्यवस्थित केले, रोलर मैदानातून बाहेर काढला आणि दुसऱ्या दिवशी खेळपट्टी सपाट झालेली होती. सूत्रांनी सांगितले की, या गोष्टीची तपासणी झाली पाहिजे की, संघाच्या विरोधात जाऊन क्यूरेटरला कोणी निर्देश दिले?
अहवालात लिहिले आहे की, या सामन्यानंतर रवी शास्त्री आणि भरत अरुण खूप नाराज झाले होते. त्यांनी बीसीसीआयकडे क्यूरेटर बदलण्याची मागणी केली होती. याबाबतीत अजून कोणीही विधान केलेले नाही.
चेन्नईच्या खेळपट्टी पहिल्या तीन दिवस फलंदाजीसाठी चांगली ठरली आणि याचा फायदा इंग्लंड संघाला झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो रुटच्या द्विशतकाच्या मदतीने इंग्लंडने ५७८ धावा केल्या. प्रत्त्युतरात भारतीय संघ ३३७ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात इंग्लंड संघ केवळ १७८ धावा करू शकला, परंतु पहिल्या डावाच्या आधारावर ४२० धावांचे लक्ष्य भारतासमोर ठेवले. भारतीय संघ १९२ धावांवरच गारद झाला आणि इंग्लंडने २२७ धावांनी सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या
‘मुलाखत घेताना मला खेळाडूंची भिती वाटायची, ते मला…’, स्पोर्ट्स अँकरचा क्रिकेटपटूंबद्दल मोठा खुलासा
महान फलंदाज गावसकरांनी शेन वॉर्नबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य; भडकली ऑस्ट्रेलियन मीडिया