---Advertisement---

कडक ना भावा! श्रेयस अय्यरने चेंडू डायरेक्ट स्टेडियम बाहेर मारत पूर्ण केले अर्धशतक, पाहा व्हिडिओ

On: रविवार, मार्च 13, 2022 4:37 PM
Shreyas-Iyer-Six
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. दिवस-रात्र स्वरुपाच्या या सामन्यात पहिल्या दिवशी तब्बल १६ विकेट्स पडल्या. भारताचा पहिला डाव अवघ्या २५२ धावांवर गुंडाळला गेला. परंतु, यादरम्यान युवा फलंदाज श्रेयस अय्यर याने जबरदस्त प्रदर्शन केले. श्रेयसने स्वतःचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी एक असा षटकार मारला जो स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडला.

भारतीय संघाच्या फलंदाजीवेळी श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) वैयक्तिक ४४ धावा केल्या होत्या आणि खेळपट्टीवर कायम होता. त्यावेळी श्रीलंकेचा धनंजया डी सिल्वा गोलंदाजी करत होता. डी सिल्वाने टाकलेल्या ४८ षटकातील शेवटचा चेंडू श्रेयसने मिडविकेटच्या वरून षटकारासाठी मारला. प्रेक्षकांसह स्वतः गोलंदाजही श्रेयसचा हा षटकार पाहून हैराण झाला.

षटकार एवढा मोठा होता की, चेंडूने स्टेडियमच्या छतावरून पलिकडे गेला. या षटकारासह श्रेयसने स्वतःचे अर्धशतकही पूर्ण केले. अर्धशतक झाल्यावर श्रेयसने मैदानातील सर्वांना अभिवादन करण्यासाठी डोक्यातील हेल्मेट काढले आणि बॅट हवेत उचलली.

कोरोनाचा नियमांमध्ये थोडी शिथिलता देऊन एम चिन्नास्वामी स्टेडियममधील कसोटीसाठी प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. त्यामुळे अय्यरनेही अर्धशतकानंतर सर्वांना अभिवादन दिले. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल होती आणि याठिकाणी अशी उत्कृष्ट खेळी करणे सोपी गोष्ट नव्हते. श्रेयने सामन्याच्या पहिल्या डावात ९८ चेंडू खेळले आणि ९२ धावा केल्या. यामध्ये त्याच्या १० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. श्रेयसने दुर्दैव असे की, शतकापासून अवघ्या ८ धावांवर असताना तो विकेट गमावून बसला.

व्हिडिओ पाहाण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५९.१ षटकात २५२ धावा केल्या आणि सर्व विकेट्स गमावल्या. त्यानंतर श्रीलंका संघाला पहिल्याच दिवशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंका संघाने ६ विकेट्स गमावल्या आणि ८६ धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---