---Advertisement---

ताक धिना धिन धा! श्रीलंकेच्या कर्णधाराला बाद करणाऱ्या शमीच्या डोक्यावर अश्विनने वाजवला तबला- Video

On: सोमवार, मार्च 7, 2022 11:47 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा विजयरथ सुस्साट सुटलेला दिसतोय. नुकताच रविवारी (०६ मार्च) कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याच्या नेतृत्त्वाखाली भारताने श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) पहिल्या कसोटी सामन्यात (First Test) मोठा विजय मिळवला आहे. मोहालीच्या मैदानावर हा सामना झाला असून भारतीय संघाने १ डाव आणि २२२ धावांच्या फरकाने हा सामना जिंकला आहे. या विजयासह त्यांनी मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे. या सामन्यादरम्यान एक मजेशीर घटना पाहायला मिळाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) याची विकेट घेतली. त्यानंतर त्याचा संघसहकारी आणि फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने त्याच्या विकेटला मजेशीर पद्धतीने सेलिब्रेट केले.

तर झाले असे की, भारताच्या ५७५ धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात १७४ धावांवरच गारद झाला होता. त्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेला फॉलोऑन दिला होता. मात्र दुसऱ्या डावातही श्रीलंकेचा संघ १७८ धावाच करू शकला. या डावादरम्यान श्रीलंकेचा कर्णधार करूणारत्ने लहिरू थिरिमानेसोबत सलामीला फलंदाजीसाठी आला होता. थिरिमाने तिसऱ्या  षटकात खातेही न खोलता बाद झाला होता. त्यानंतर करूणारत्ने सावध होऊन खेळत होता.

परंतु १६ व्या षटकात शमीने यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातून करूणारत्नेला २७ धावांवर झेलबाद केले. करूणारत्नेची महत्त्वपूर्ण विकेट घेत शमीने भारतीय संघाचे पारडे जड केले. यानंतर भारतीय संघातील खेळाडू शमीला विकेटसाठी शुभेच्छा देताना दिसले. यावेळी अश्विनने शमीने डोक्यावर आपल्या हाताच्या बोटांच्या साहाय्याने तबला वाजवत (Ashwin Played Tabla On Shami’s Head) सेलिब्रेशन केले. या गमतीशीर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

https://twitter.com/crickaddict45/status/1500371558065344514?s=20&t=bQXMn6FLACyySt0c1Hj18A

शमीने पहिल्या कसोटीत घेतल्या ३ विकेट्स
मोहालीची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांपेक्षा जास्त फिरकी गोलंदाजांना मदत करताना दिसली. तरीही वेगवान गोलंदाज शमीने या सामन्यात श्रीलंकेच्या ३ फलंदाजांना पव्हेलियनला पाठवले. पहिल्या डावात १२ षटके गोलंदाजी करताना २७ धावा देत तो एकच विकेट घेऊ शकला. परंतु दुसऱ्या डावात त्याने २ विकेट्स काढल्या. ८ षटके गोलंदाजी करताना ४८ धावा देत त्याने या विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

कर्णधार रोहित शर्माने खांद्यावर घेतली मोठी जबाबदारी! म्हणाला, ‘विजयापेक्षा संघात बेंच स्ट्रेंथ…’

कर्नाटकचा ‘हा’ युवा फलंदाज ठोठावतोय टीम इंडियाचं दार, गेल्या २ वर्षांपासून आहे तुफान फॉर्ममध्ये

चक्क महिला मुख्यमंत्रीला आपल्या प्रेमात पाडणारे भारतीय दिग्गज, ज्यांच्या कारकिर्दीचा झाला दुर्दैवी अंत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---