---Advertisement---

अब वनडे में टी20 खेलूंगा..! श्रीलंकेविरुद्ध रोहितचा रुद्रावतार, केवळ 33 चेंडूंत ठोकले वादळी अर्धशतक

On: शुक्रवार, ऑगस्ट 2, 2024 7:39 PM
rohit sharma
---Advertisement---

Rohit Sharma Fifty :- हिटमॅन रोहित शर्मा याने शुक्रवारी (02 ऑगस्ट) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. 29 जूनला भारतीय संघाला टी20 विश्वचषक जिंकून दिल्यानंतर कर्णधार रोहित मोठ्या सुट्टीवर गेला होता. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी रोहित सुट्टी संपवून भारतीय संघात परतला. यावेळी महिनाभरानंतर मैदानावर पुनरागमन करताना रोहितचे रौद्र रूप पाहायला मिळाले.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 230 धावा केल्या. प्रत्युत्तरात रोहित आणि उपकर्णधार शुबमन गिलची जोडी सलामीसाठी मैदानावर उतरली. पहिला डॉट बॉल खेळल्यानंतर असिथ फर्नांडोच्या दुसऱ्याच चेंडूवर रोहितने शानदार षटकार ठोकत डावाची धमाकेदार सुरुवात केली. आपली वादळी खेळी सुरू ठेवत रोहितने षटकारासह आपले अर्धशतकही पूर्ण केले. विशेष म्हणजे, केवळ 33 चेंडूत रोहितने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान त्याने 3 षटकार आणि 7 चौकार ठोकले.

या अर्धशतकी खेळीसह रोहितने वनडे सामन्यातील पहिल्या 10 षटकांत तिसऱ्यांदा अर्धशतक करण्याचा पराक्रम केला आहे. पहिल्या 10 षटकांत सर्वाधिक वनडे अर्धशतके करण्याचा विक्रम माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याच्या नावावर जमा आहे. त्याने तब्बल 7 वेळा हा भीमपराक्रम केला आहे. तर सचिन तेंडूलकर, रॉबिन उथप्पा आणि गौतम गंभीर यांना प्रत्येकी 1 वेळा पहिल्या 10 षटकांमध्ये वेगवान अर्धशतक करता आले आहे.

दरम्यान श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना भारताला 231 धावांचे लक्ष्य दिले. श्रीलंकेकडून सलामीवीर पथुम निसांकाने अर्धशतक ठोकले. 9 चौकारांसह त्याने 56 धावांची संथ खेळी केली. तसेच खालच्या फळीत दुनिथ वेल्लालगे याने नाबाद 67 धावांचे योगदान दिले. या खेळीदरम्यान त्याने 2 षटकार आणि 7 चौकार मारले.

महत्त्वाच्या बातम्या-

“अरे माझ्याकडे काय बघतोय?”, श्रीलंकन फलंदाजाच्या विकेटवरुन गोंधळलेल्या रोहितची मजेशीर प्रतिक्रिया

आयपीएलवाला रूल है क्या! भारतीय खेळाडूंचा मजेशीर संवाद स्टंप माईकमध्ये कैद, व्हिडिओ व्हायरल

चाहत्यांचा हार्टब्रेक! स्टार बॅडमिंटनपटूच्या हाती निराशा, सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न भंगले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---