भारत आणि श्रीलंका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव केला. श्रीलंकेनं भारतासमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं होतं. 3 सामन्यांच्या एकदिवसीय श्रीलंकेनं 0-1 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी श्रीलंकेनं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
श्रीलंकेसाठी प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर अविष्का फर्नांडोनं (Avishka Fernando) 62 चेंडूत (40) धावांची खेळी खेळली. 40 धावांच्या खेळीत त्यानं 5 चौकार लगावले. तर कामिंदू मेंडिसनं देखील (40) धावा केल्या. यष्टीरक्षक कुसल मेंडिसनं (30) धावांची खेळी खेळली. त्याच्या खेळीत त्यानं 3 चौकार लगावले. दुनिथ वेल्लालागेनं (39) धावांची खेळी खेळली. त्यामध्ये त्यानं 2 षटकारांहस 1 चौकार लगावला. कर्णधार चरिथ असलंकानं (25) धावांची खेळी केली. त्यावर श्रीलंकेनं 9 गडी गमावून 240 धावा केल्या.
भारतासाठी गोलंदाजी करताना फिरकीपटू वाॅशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर दिग्गज फिरकीपटू कुलदीप यादवनं (Kuldip Yadav) 2 विकेट्स घेतल्या. अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) आणि मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) 1-1 विकेट मिळवली.
श्रीलंकेनं दिलेल्या 241 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 10 गडी गमावून 208 धावाच करु शकला. भारतासाठी कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) 44 चेंडूत सर्वाधिक (64) धावांची खेळी केली. त्यामध्ये त्यानं 6 चौकारांसह 4 षटकार ठोकले. अक्षर पटेल (Axar Patel) (44) धावा केल्या. त्यामध्ये त्यानं 2 षटकार आणि 4 चौकार लगावले. सलामीवीर शुबमन गिलनं (35) धावांची खेळी खेळली. भारताच्या बाकी फलंदाजांच्या हाती केवळ निराशाच लागली.
श्रीलंकेसाठी जेफ्री वेंडरसेनं भारतीय संघाला फलंदाजी करताना डोकंच वर काढू दिलं नाही. त्यानं शानदार गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवत 6 विकेट्स त्याच्या नावावर केल्या. विराट, रोहित सारख्या दिग्गज खेळाडूंना त्यानं तंबूत पाठवले. श्रीलंकेसाठी तो सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला. तर कर्णधार चरिथ असलंकानं (Charith Asalanka) 3 विकेट्स घेत संघाला विजय मिळवून देण्यासाठी मोलाचा हातभार लावला.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी दोन्ही संघ
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
श्रीलंका- चरिथ असालंका (कर्णधार) पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला धनाजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे
महत्त्वाच्या बातम्या-
SL vs IND : श्रीलंकेचा लखलखता तारा, जोरदार ‘सिक्स’ मारत जेफ्री वँडरसेने टीम इंडियाला आणले बॅकफूटवर
बाऊंड्रीलाईनवरून श्रेयस अय्यरचा गुलीगत थ्रो, बॅट्समनच्या दांड्या गुल; व्हिडिओ व्हायरल
वयाच्या 37व्या वर्षी जिंकलं सुवर्णपदक..! नोव्हाक जोकोविचनं रचला इतिहास