---Advertisement---

‘फायर है मैं’, श्रीलंकेविरुद्ध अप्रतिम प्रदर्शनानंतर श्रेयस अय्यर सोशल मीडियावर ट्रेंड; मीम्स होतायेत व्हायरल

Shreyas-Iyer
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20 Series) यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका रविवारी संपली. मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. मालिकेतील एकही सामना न गमावल्यामुळे भारतीय संघ श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यात यशस्वी राहिला. मालिकेत भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने जबरदस्त प्रदर्शन केले आणि तिन्ही सामन्यांमध्ये नाबाद राहिला. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर देखील तो ट्रेंडमध्ये आहे.

भारतीय संघासाठी श्रेयस अय्यरने सलग तिसऱ्यांदा दमदार प्रदर्शन केले आणि विजय मिळवून दिला. टी-२० मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये तो नाबाद राहिला आणि तिन्हीमध्ये अर्धशतकी खेळी केली. शेवटच्या टी-२० सामन्यात त्याने ४५ चेंडूत ७३ धावा केल्या आणि श्रीलंकन गोलंदाजांची अवस्था बिकट केली. तत्पूर्वी पहिल्या आणि दुसऱ्या टी-२० सामन्यायत श्रेयसने अनुक्रमे नाबाद ५७ आणि ७४ धावा ठोकल्या होत्या. मालिकेत त्याने एकूण २०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याचे हे प्रदर्शन पाहून चाहतेही खूप खुश असल्याचे पाहायला मिळत आहेत. ट्वीटरवर त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

https://twitter.com/idle__student/status/1498168512778358787

https://twitter.com/beingaryan95/status/1497979042951479305

दरम्यान, मालिकेतील शेवटच्या सामन्याचा विचार केला, तर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी ५ विकेट्सच्या नुकसानावर १४६ धावा केल्या आणि विजयासाठी भारतासमोर १४७ धावांचे लक्ष ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने चार विकेट्सच्या नुकसानावर सोपा विजय मिळवला. सामना एकतरफी झाला, पण भारताची सलामीवीर जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली.

ईशान किशन मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अनुपस्थितीत असल्यामुळ रोहित शर्मा आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली. रोहितने अवघ्या ५ धावा करून विकेट गमावली, तर संजूने १८ धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर श्रेयसला खेळण्याची संधी मिळाली आणि तो पुन्हा एकदा विश्वासास पात्र ठरला. त्याने केलेल्या ७३ धावांमध्ये ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त एकही भारतीय फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकला नाही. दुसरीकडे श्रीलंकेसाठी कर्णधार दासून शनाकाने पुन्हा एकचा चांगले खेळी करत ७४ धावा केल्या, पण अखेरीस त्यांना पराभव पत्करावा लागला.

महत्वाच्या बातम्या –

‘माझ्या संघासाठी चांगला खेळलो याचा आनंद आहे’, श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यानंतर जडेजाचे विधान

आयएसएल: मोहन बागान विजयी ट्रॅकवर; प्ले-ऑफच्या रेसमध्ये कायम

नादच खुळा! तिसऱ्या टी२० सामन्यात अर्धशतक ठोकताच श्रेयसचा जबरदस्त विक्रम; बनला विराटनंतरचा दुसराच भारतीय

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---