---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या टी२० पूर्वी सुनील गावसकरांना मोठा मान; विशेष घटनेनंतर होणार सामना सुरू

On: गुरूवार, फेब्रुवारी 24, 2022 12:12 PM
sunil-gavaskar
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका (IND vs SL t20 series) यांच्यातील पहिला टी-२० सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अलट बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. सामन्याची सुरुवात माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर (sunil gavaskar) घंटा वाजवून करतील. या सामन्याने दोन्ही संघातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होईल. 

या मालिकेपूर्वी वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने भारताने जिंकले आणि क्लीन स्वीप दिला. श्रीलंकेविरुद्धही अशाच प्रदर्शनाचा भारताचा प्रयत्न असेल. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळली जाणार आहे.

टी-२० मालिकेची सुरुवात सुनील गावसकर यांच्या हस्त घंटा वाजवून केली जाणार आहे. यासंदर्भात पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी उत्तर प्रदेश क्रिकेट बोर्डकडून (यूपीसीए) माहिती देण्यात आली.

यूपीसीएने दिलेल्या माहितीनुसार, “यूपीसीएला भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम, लखनऊ येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-२० सामना विश्वचषक विजेते खेळाडू सुनील गावसकर यांच्या हस्त घंटा वाजवून सुरु करण्याची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. यूपीएसएच्या इतिहासात ही पहिली वेळ आहे, जेव्हा सामन्याची सुरुवात घंटा वाजवून केली जात आहे, याची सुरुवात सुनील गावसकर सारखे दिग्गज खेळाडू करत आहेत. आम्ही देशातील एका प्रमुख राज्य क्रिकेट बोर्डच्या रूपात उभे आहोत आणि आमच्याद्वारे आयोजित प्रत्येक स्पर्धेत यूपीसीएचा झेंडा उंच फडकवत ठेवण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.”

दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत ३-० अशा मोठा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. अशात श्रीलंकेविरुद्धही चांगले प्रदर्शन करून संघ क्रमवारीतल पहिले स्थान अधिक भक्कम करण्याच्या प्रयत्नात आसेल.

टी-२० मालिकेसाठी भारत आणि श्रीलंका संघ –
भारत संघ – ऋतुराज गायकवाड, इशान किशन(यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रोहित शर्मा(कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, दीपक हुडा, आवेश खान, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव युझवेंद्र चहल.

श्रीलंका संघ – पाथम निसांका, दनुष्का गुनाथिलाका, कामिल मिश्रा(यष्टीरक्षक), दिनेश चंडीमल, चारिथ असलंका, दासुन शनका(कर्णधार), चमिका करुणारत्ने, जेफ्री वेंडरस, प्रवीण जयविक्रमा, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, जेनिथ लियानागे, अशियन डॅनिल, शिरन फर्नांडो, बिनुरा फर्नांडो.

मगत्वाच्या बातम्या –

केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना? जाणून घ्या सर्वकाही

भारीच ना! हैदराबाद एफसीचा उपांत्य फेरीत प्रवेश, केरला ब्लास्टर्सवर मिळवला दमदार विजय

द्विशतक अन् २४ फेब्रुवारीचा ‘याराना’! ‘या’ तीन खेळाडूंनी एकाच दिवशी घातली दुहेरी शतकाला गवसणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---