---Advertisement---

कॉफी घेणार का? हिमाचलच्या थंडीची सामन्यादरम्यान कर्णधार रोहित लुटतोय मजा, पाहा व्हिडिओ

On: रविवार, फेब्रुवारी 27, 2022 4:07 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka T20 Series) यांच्यात सध्या तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना धरमशाला स्टेडियममध्ये खेळला गेला आणि भारताने यामध्ये ७ विकेट्सने विजय मिळवला. हिमाचल प्रदेशमधील धरमशालामध्ये सध्या खूप थंडी आहे आणि खेळाडू या थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत. अशातच भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

शनिवारी (२६ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान धरमशाला स्टेडियममध्ये कडाक्याची थंडी पडल्याची पाहायला मिळाली. अशात कर्णधार रोहित शर्मा गरमा- गरम कॉफीचा आनंद घेताना दिसत आहे. रोहित कॉफी पीत असताना तो कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. रोहितला जेव्हा समजले की, कॉफी पिताना संपूर्ण देश त्याला पाहत आहे, तेव्हा त्याने कॅमेराकडे पाहून चाहत्यांना कॉफी प्यायला आमंत्रित देखील केले. त्याचा हा अंदाज चाहत्यांना खूपच भावल्याचे दिसत आहे. बीसीसीआयने अधिकृत ट्वीटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे, जो वेगात व्हायरल होत आहे.

दरम्यान, भारत आणि श्रीलंकेतील दुसऱ्या सामन्याचा विचार केला, तर रोहितचे प्रदर्शन निराशाजनक राहिले. भारताच्या डावाच्या पहिल्या षटकात रोहित त्रिफळाचीत झाला. त्याने अवघ्या दोन चेंडूंचा सामना केला आणि एक धाव केली. मागच्या तीन टी-२० सामन्यांमध्ये रोहित शर्मा सलग तीन वेळा त्रिफळाचीत झाला आहे. रोहितसोबत सलामीसाठी आलेला ईशान किशनसुद्धा स्वस्तात बाद झाला. ईशानने १५ चेंडू खेळले आणि १६ धावा करून विकेट गमावली.

सलामीवीर जोडी स्वस्तात बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनने भारताचा डाव सावरला. श्रेयसने सर्वाधिक ७४ धावा केल्या, ज्यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले. तसेच संजू सॅमसन ३९ धावा करून झेलबाद झाला. सॅमसननंतर मैदानात आलेला अष्टपैलू रवींद्र जडेजाने येताच फटकेबाजीला सुरुवात केली. जडेजाने १८ चेंडूत ४५ धावा केल्या. या तिघांनी केलेल्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर भारताने डावाच्या १७.१ षटकात विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडीही घेतली.

महत्वाच्या बातम्या –

विश्वचषकापूर्वी घडली हृदयाचा ठोका चुकवणारी घटना, स्म्रीती मंधाना डोक्याला बाउंसर लागून जखमी

युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी रोहित शर्मा उच्छुक, म्हणाला २७ जणांना आजमावले आहे आणि अजून…

इशान किशन डोक्याला चेंडू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल, ‘अशी’ घडली हृदयाचा ठोका चुकवणारी घटना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---