भारत आणि श्रीलंका (IND VS SL t20 series) यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका २४ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. मालिका भारतात खेळली जाणार आहे. पहिला सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे आणि संघ यासाठी लखनऊमध्ये दाखल झाले आहेत. पहिला सामना खेळण्यापूर्वी भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने ‘पुष्पा’ चित्रपटातील डायलॅगवर एक खास रिल शेअर केली आहे.
चहलने भारतीय संघाच्या बसमध्ये हा व्हिडओ बनवला आहे. व्हिडिओत त्याच्या सोबत नवदीप सैनी आणि हरप्रीत ब्रार दिसत आहेत. हे तिन्ही खेळाडू ‘पुष्पा’ चित्रपटातील “पुष्पा नाम सुनकर प्लावर समझे क्या, फायर है मै, झुकूंगा नही” हा डायलॅग बोलले आहेत. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात रिलीज झाला होता आणि चाहत्यांना तो खूपच आवडला आहे. त्यातील डायलॅग सर्वत्र हिट झाले आहेत.
चहलच्या आधीही अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी या चित्रपटातील डायलॅगवर रिल आणि व्हिडिओ बनवून शेअर केला आहेत. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरचा यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
https://www.instagram.com/reel/CaRSEYKOlnK/?utm_source=ig_web_copy_link
चहलसोबत या व्हिडिओत दिसणारे नवदीप सैनी आणि हरप्रीत ब्रार यांना श्रीलंकेविरुद्धच्या या आगामी टी-२० मालिकेत संधी मिळालेली नाहीय. परंतु नेट गोलंदाजाच्या रुपात ते संघासोबत सहभागी झालेले आहेत. तर युजवेंद्र चहलला मात्र पहिल्या टी-२० सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
जसप्रीत बुमराहला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत विश्रांती दिली गेली होती. आत बुमहारने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात पुनरागमन केले आहे. बुमराह आणि चहल भारतीय संघासाठी सर्वाधिक टी-२० विकेट्स घेणार गोलंदाज आहेत. या दोघांनी प्रत्येकी ६६ विकेट्स घेतल्या आहेत. या दोघांमध्ये पहिल्या क्रमांक पटकावण्यासाठी शर्यत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्ध खेळताना भारतीय संघाने अप्रतिम प्रदर्शन केले होते. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतील सर्वच्या सर्व सामने भारताने जिंकले आणि क्लीन स्वीप (३-०) दिला. आता श्रीलंकेविरुद्धही असेच प्रदर्शन करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. मागच्या वर्षी भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. त्याठिकाणी भारताने १-२ अशा फरकाने टी-२० मालिकेत पराभव पत्करला होता.
महत्मवाच्या बातम्या –
T20 WC 2022: युएई ८ वर्षांनी खेळणार टी२० विश्वचषकात, आयर्लंडही स्पर्धेसाठी पात्र
…आणि सर्वात मोठ्या रनचेजमध्ये अर्धवट नशेत गिब्जने केली वादळी खेळी
श्रीलंकेविरुद्ध ‘अशी’ असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन; तीन बडे खेळाडू करणार पुनरागमन