टीम इंडियाच्या मिशन श्रीलंकेला 27 जुलै पासून सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये टीम इंडियाला 3 सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. ज्यासाठी भारतीय संघ आज (22 जुलै) रवाना झाला आहे. संघातील अनेक खेळाडू मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत दिसले. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरची ही पहिलीच जबाबदारी असेल.
न्यूज एजन्सी ‘एनआय’ने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये गौतम गंभीरसह अनेक खेळाडू श्रीलंकेला रवाना झालेले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर प्रथम दिसत आहेत. यानंतर संजू सॅमसन आणि रवी बिश्नोई यांच्यासह अनेक खेळाडू बसमध्ये चढताना दिसले.
INDIAN TEAM LEAVING TO SRI LANKA…!!!!
– It’s time for Gambhir 🤝 Surya in T20I. 🇮🇳 pic.twitter.com/DDKn5pcuZ4
— Johns. (@CricCrazyJohns) July 22, 2024
गौतम गंभीर श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. यापूर्वी, राहुल द्रविड संघाचे मुख्य प्रशिक्षक होते, ज्यांचा कार्यकाळ 2024 टी-20 विश्वचषकानंतर संपला होता. तसेच रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादवला भारताच्या टी20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले. यापूर्वी हार्दिक पांड्याकडे कर्णधार म्हणून पाहिले जात होते, परंतु खराब फिटनेस रेकॉर्डमुळे हार्दिक कर्णधार बनू शकला नाही. शुभमन गिलला वनडे आणि टी-20 मालिकेत उपकर्णधार बनवण्यात आले.
#WATCH | Mumbai | Indian Men’s Cricket Team arrives at the Airport, they’ll leave for Sri Lanka, shortly.
Indian Cricket Team will play the ODI and T20I series, 3 matches each, against Sri Lanka, starting on July 27 and ending on August 7. pic.twitter.com/ykoL797TuO
— ANI (@ANI) July 22, 2024
#WATCH | Mumbai | Indian Men’s Cricket Team arrives at the Airport, they’ll leave for Sri Lanka, shortly.
Indian Cricket Team will play the ODI and T20I series, 3 matches each, against Sri Lanka, starting on July 27 and ending on August 7. pic.twitter.com/ZmBmBqLasH
— ANI (@ANI) July 22, 2024
श्रीलंकेदाैऱ्यासाठी भारतीय संघाचे वेळापत्रक
27 जुलै – पहिला टी20, संध्याकाळी 7 वाजता, पल्लेकेले
28 जुलै – दुसरी टी20, संध्याकाळी 7 वाजता, पल्लेकेले
30 जुलै – तिसरी टी20, संध्याकाळी 7 वाजता, पल्लेकेले
2 ऑगस्ट – पहिली वनडे, दुपारी 2.30 वाजता, कोलंबो
4 ऑगस्ट – दुसरी वनडे, दुपारी 2.30 वाजता, कोलंबो
7 ऑगस्ट – तिसरी वनडे, दुपारी 2.30 वाजता, कोलंबो
भारतीय टी20 संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीसोबतच्या नात्यावर गौतम गंभीरची स्फोटक प्रतिक्रिया; म्हणाला, “हे टीआरपीसाठी…”
‘विराट-रोहित पुढचा वर्ल्डकप खेळतील का?’, कोच गंभीर म्हणाला; जर….
रवींद्र जडेजाला संघातून वगळलं का? आगरकर म्हणाले, “त्याला निवडण्यात काही अर्थ…”