---Advertisement---

पिंक बॉल टेस्ट अक्षर पटेलसाठी ठरणार ऐतिहासिक? तब्बल १३३ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची करू शकतो बरोबरी

---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा आणि शेवटचा सामना शनिवारी (१२ मार्च) बेंगलोरमध्ये सुरू झाला. हा सामना दिवस-रात्र स्वरूपात खेळला जात असून सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर होत आहे. भारताचा अष्टपैलू अक्षर पटेल याने गुलाबी चेंडूने केलेले प्रदर्शन खूपच अप्रतिम राहिले होते. आता श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली असून तो चांगले प्रदर्शन करेल अशी अपेक्षा आहे. या सामन्यात अक्षर पटेल १३३ वर्ष जुन्या एक विक्रमाची बरोबरी करू शकतो.

अक्षर पटेल (Axar Patel) श्रीलंकेविरुद्धच्या या गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात सर्वात वेगात ५० कसोटी विकेट्स पूर्ण करणारा गोलंदाज बनू शकतो. हा विक्रम करण्यासाठी अक्षरला या सामन्यात १४ विकेट्स घेण्याची गरज आहे. जर त्याने या सामन्यात १४ विकेट्स घेतल्या, तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने ५० विकेट्स पूर्ण करण्याच्या विक्रमाची बरोबरी करू शकतो.

अक्षर पटेलने आतापर्यंत खेळलेल्या ५ कसोटी सामन्यात ३६ विकेट्स घेतल्या आहेत. सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये अक्षरने ३२ विकेट्स घेतल्या होत्या, पण पुढच्या तीन डावांमध्ये तो फक्त ४ विकेट्स घेऊ शकला. याच कारणास्तव हा विश्वविक्रम मोडण्याची संधी अक्षरकडे राहिली नाहीय, पण या विक्रमाची बरोबरी तो करू शकतो.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ५० विकेट्स घेण्याची कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या चर्ल्स टर्नर यांच्या नावावर आहे. टर्नर यांनी १८८० मध्ये त्यांच्या पहिल्या ६ कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती. तसेच दक्षिण अफ्रिकेच्या वर्नेन फिलँडरने ही कामगिरी सुरुवातीच्या सात कसोटी सामन्यांमध्ये केली होती.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अक्षर पटेल दुखापतीमुळे सहभाग घेऊ शकला नव्हता. परंतु दुसऱ्या सामन्यापूर्वी त्याने संघात पुनरागमन केले आहे. अक्षर पटलेचे कसोटी क्रिकेटमधील प्रदर्शन पाहता त्याला संधी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये संघासाठी फायदेशीर प्रदर्शन करू शकतो.

महत्वाच्या बातम्या –

हरमनप्रीत कौरचा वेस्ट इंडिजला दे दणादण, विश्वचषक सामन्यात शतक झळकावत बनली अव्वल

फलंदाजीतून धावांचा पाऊस पाडणारा वॉर्नर टेनिसमध्ये आहे पटाईत; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ‘मी चांगलाच खेळतो…’

स्म्रीती मंधनाचे रेकॉर्डब्रेक शतक! विश्वचषकात १२३ धावांच्या खेळीसह तीन विक्रमात पटकावले अव्वल स्थान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---