भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मलिकेचा दुसरा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ सर्वबाद झाला. परंतु युवा फलंदाज श्रेयस अय्यरने अप्रतिम प्रदर्शन केले आणि पहिल्या डावात संघाची धावसंख्या २५२ पर्यंत घेऊन गेला. असे असले तरी, श्रेयस शतकापासून अवख्या आठ धावांच्या अंतरावर असताना बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याने प्रतिक्रिया दिली.
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या (Ind vs SL Test Series) पहिल्या डावात श्रेयस अय्यर एकमेव फलंदाज होता, ज्याने भारतासाठी अर्धशतकी खेळी केली. पहिल्या डावात त्याने ९८ चेंडूंचा सामना केला आणि यामध्ये १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ९२ धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर श्रेयस म्हणाला, ‘मी ठरवले होते की, मी चेंडूला डिफेंस करताना बाद होणार नाही. कारण अशा पद्धतीने बाद होण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे मी असे उद्दिष्ट ठेवले.’
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) म्हणाला की, ‘मी जेव्हा ८० धावांवर्यंत पोहोचलो, तेव्हा माझ्या डोक्यात शतक करण्याचा विचार नव्हता. जसप्रीत (बुमराह) एवढ्या चांगल्या प्रकारे डिफेंस करत होता की, मला वाटलेच नाही की, मी जलद खेळून धावा केल्या पाहिजेत. मी फटका मारला. मी बाद होऊ शकत होतो, पण मला कसलाही पश्चाताप नव्हता. जेव्हा चेंडू नवा होता, तेव्हा तो सीम आणि स्विंग होत होता.’
दरम्यान, श्रेयसने संघासाठी पहिल्या डावात सर्वाधिक धावांचे योगदान दिले आणि त्याच्या खेळीच्या जोरावरत भारतीय संघ कसाबसा २०० धावांचा टप्पा पार करू शकला. संघाचे सलामीवीर पूर्णपणे अपयशी ठरले, तसेच इतर फलंदाजांपैकी कोणाला अर्धशतकी खेळीही करता आली नाही. यादरम्यान श्रेयसने मात्र कठीण परिस्थितीत रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांच्यासोबत महत्वपूर्ण भागीदारी केली.
भारतीय संघ २५२ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर श्रीलंका संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याच्या ६ विकेट्स गमावल्या. एकंदरित पाहता पहिल्या दिवशी गोलंदाजांनी मैदानात वर्चस्व प्रस्थापित केले. पहिल्या दिवशी मैदानात एकूण १६ खेळाडूंनी विकेट्स गमावल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने ६ विकेट्सच्या नुकसानावर ८६ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या –
ऑटोचालकाचा मुलगा ते बीएमडब्ल्यूचा मालक! वाचा मोहम्मद सिराजच्या संघर्षमय क्रिकेट प्रवासाची कहाणी
वेस्ट इंडीजच्या दोन टी२० विश्वचषक विजयाचा साक्षीदार, ज्याला मिळाली नाही अपेक्षेप्रमाणे संधी
आयपीएल २०२२ मध्ये २ कर्णधार विदेशी, तर ८ संघांच्या नेतृत्वाची कमान भारतीय खेळाडूंकडे; पाहा यादी






