भारतीय संघ मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना झाला. सामन्याच्या पहिल्या डावात भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने जबरदस्त खेळी केली. दुसऱ्या दिवशी जडेजाने नाबाद १७५ धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने ८ विकेट्सच्या नुकसानावर ५७४ धावा केल्या आणि डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बीसीसीआयसाठी मयंक अगरवालने त्याची मुलाखत घेतली. यावेळी जडेजाने स्वतःच्या खेळीत केलेल्या बदलांविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली. याबरोबरच त्याने पुष्पाराज सेलिब्रेशनही केले.
मयंक अगरवाल (Mayank Agarwal) बीसीसीआयसाठी घेतलेल्या या मुलाखतीत त्याने जडेजाला प्रश्न विचरले आहेत. त्याच्या खेळीविषयी बोलताना रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) म्हणाला की, ‘मी माझ्या माइंडसेटमध्ये खूप बदल केला आहे. आधी मी फलंदाजीविषयी जास्त विचार करत नव्हतो, पण मागच्या २ – ३ वर्षांपासून मी माझ्या फलंदाजीवर लक्ष दिले आहे.’
तो म्हणाला की, ‘मी स्वतःला बदलले आहे. मी रणजी ट्रॉफीत धावा केल्या आहेत, मग मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा करण्याचा विचार का नको करायला.’ जडेजाने सांगितल्याप्रामाणे गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही त्याने चांगले प्रदर्शन केले. मुलाखतीत जडेजाने ‘पुष्पा राज’ (Puspa Raj) स्टाईलमध्ये शतकाचा आनंदही व्यक्त केला. बीसीसीआयने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1500313936490467328
दरम्यान, पहिल्या डावात जडेजा १७५ धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिला. हे त्याच्या कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक होते. या सामन्यात तो द्विशतक करू शकत होता, पण भारतीय संघाने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जडेजा आणि रिषभ पंत यांनी १०३ धावांची, तर जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी १३० धावांची भागीदारी केली. पहिल्या डावात रिषभ पंतचेही शतक थोडक्यात हुलके. त्याने ९६ धावा करून स्वतःची विकेट गमवाली.
त्यानंतर श्रीलंका संघ पहिल्या डावात अवघ्या १७४ धावांवर सर्वबाद झाला. परिणामी पहिल्या डावात भारतीय संघाने तब्बल ४०० धावांची आघाडी घेतली आणि श्रीलंका संघाला फॉलोऑन दिला. श्रीलंका संघ दुसऱ्या डावातही १७८ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने हा सामना एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला.
महत्वाच्या बातम्या –
आर अश्विन झाला ‘तीस हजारी’! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘असा’ विक्रम करणारा चौथाच भारतीय
‘शेन वॉर्नने मला मोठा मंच उपलब्ध करून दिला’, नाबाद १७५ धावा ठोकल्यानंतर ‘रॉकस्टार’ जडेजा भावुक
इंडिया लिजेंड्सचा फ्रेंडशिप कपमध्ये मानहानिकारक पराभव; वर्ल्ड लिजेंड्सचा तब्बल ७३ धावांनी विजय





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा