शतकापासून अवघ्या ८ धावांच्या अंतरावर असताना श्रेयसने विकेट गमावली. या कामगिरीनंतर तो भारतीय दिग्गजांच्या त्या नकोशा यादीत सहभागी झाला, जे नव्वदीत (नर्वस नाइंटी) यष्टीचीत झाले आहेत. या यादीत भारतीय संघाचे दिग्गज दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar), महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांचा समावेश आहे. श्रेयस अय्यर या यादीत नव्याने सहभागी झाला आहे.

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर भारताच्या पहिल्या डावात मयंक अगरवाल (४) आणि रोहित शर्मा (१५) यो दान्ही सलामीवीरांना संघाची धावसंख्या २९ होईपर्यंत विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर आलेल्या हनुमा विहारी (३१) आणि विराट कोहली (२३) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. रिषभ पंतने ३९ धावा केल्या, परंतु, श्रेयस अय्यरने सर्वोत मोठी ९२ धावांची खेळी केली. श्रीलंका संघासाठी पहिल्या डावात लसिथ एबुलडेनिया आणि प्रवीण जयविक्रमे यांनी प्रत्येक ३-३ विकेट्स घेतल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या –

‘आता ही होणार आरसीबीची नवीन कर्णधार’, म्हणत ‘त्या’ व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी केले अनुष्काला ट्रोल

क्या बात है! हैदराबाद एफसीचे एक पाऊल फायनलच्या उंबरठ्यावर; एटीके मोहन बागानवर दणदणीत विजय!

आयपीएल २०२२ मध्ये २ कर्णधार विदेशी, तर ८ संघांच्या नेतृत्वाची कमान भारतीय खेळाडूंकडे; पाहा यादी