---Advertisement---

द्रविड, कोहलीकडून निवृत्तीचा सामना खेळत असलेल्या श्रीलंकन खेळाडूचे अभिनंदन, Video जिंकेल मन

On: सोमवार, मार्च 14, 2022 11:23 AM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेचा दुसरा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जात आहे. भारतीय संघा सध्या सामन्यात भक्कम स्थितीत आहे. श्रीलंका संघाचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलसाठी हा त्याचा शेवटचा कसोटी सामना आहे. त्याने आधीच घोषणा केली होती की, या सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात लकमलला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला गेला. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनीही त्याला पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याकडून लकमलला कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मिळाल्या आहेत. बीसीसीआयने या क्षणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

सुरंगा लकमल (suranga lakmal) याने श्रीलंका संघासाठी ७० कसोटी सामने खेळले आणि यामध्ये १७१ विकेट्स घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने देशासाठी ८६ सामने खेळले आणि १०९ विकेट्स घेतल्या. तसेच कारकिर्दीत खेळलेल्या ११ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ८ विकेट्स घेतल्या आहेत.

शेवटच्या कसोटी सामन्यात मात्र त्याला फक्त एक विकेट मिळाली आहे. सामन्यात अजून तीन दिवसांचा खेळ बाकी आहे. श्रीलंका संघाला विजयासाठी अजून ४१९ धावा कराव्या लागणार आहेत आणि त्यांच्या हातात ९ विकेट्सही शिल्लक आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने दुसऱ्या डावात १ विकेटच्या नुकसानावर २८ धावा केल्या आहेत.

लकमनले २००९ मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यातून श्रीलंका संघासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होतो. त्यानंतर २०१० मध्ये त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. वयाच्या ३५ व्या वर्षी त्याने निवृत्तीची घोषणा केली. कसोटी क्रिकेटमध्ये लकमलने एका डावात पाच विकेट्स घेण्याची कमाल चार वेळा केली आहे.

दरम्यान, उभय संघातील या दुसऱ्या आणि शेवटच्या सामनाचा विचार केला, तर भारतीय संघ विजयाच्या मार्गावर आहे. पहिल्या डावात भारताने २५२, तर श्रीलंका संघाने १०९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने त्यांचा दुसरा डाव ३०३ धावांवर घोषित केला. परिणामी विजयासाठी श्रीलंकेला ४४७ धावांचे लक्ष्य मिळाले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंका संघाने एक विकेटच्या नुकसानावर २८ धावा केल्या. श्रीलंकेच्या ९ विकेट्स अजून शिल्लक असल्या, तरी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचा टिकाव लागण्याची शक्यता फारच कमी आहे.

महत्वाच्या बातम्या –

राजस्थान रॉयल्सच्या युवा फलंदाजाला बनायचंय ‘ज्यूनियर युवराज’, वाचा ‘पावर हिटर’ची पूर्ण प्रतिक्रिया

असा झेल तुम्ही कधीच पाहिला नसेल! हवेत चित्त्यासारखी झेप घेत बेथ मूनीने एका हाताने पकडला अफलातून कॅच

निवृत्तीनंतर श्रीसंतला मास्टरच्या शुभेच्छा; इंस्टाग्राम पोस्ट करत लिहीले ‘खास’ शब्द

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---