भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies odi series) यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आला होता. पंत संघाचा मध्यक्रमाचा फलंदाज आहे. अशात तो रोहितसोबत सलामीसाठी आल्यामुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
पंतविषयी काय आहे संघाचे योजना
माध्यमांशी बोलताना फलंदाजी प्रशिक्षक राठोड म्हणाले की, “संघात आमच्याकडे अनेक खेळाडूंचे पर्याय आहेत. रिषभ पंत एक अप्रतिम खेळाडू आहे. वरच्या फळीत तो चांगले प्रदर्शन करू शकतो, पण ही गोष्टी यावर अवलंबून आहे की, संघाला काय हवे आहे. आम्ही काय पाहत आहोत आणि संघ पंतला फलंदाजीसाठी कुठे पाठवू इच्छितो. मला यात कसलीच शंका नाहीय की, तो २०२३ नंतरही संघात सहभागी असेल. तेव्हा तो संघाचा महत्वाचा खेळाडू असेल. परंतु, आम्ही मध्य किंवा खालच्या फळीत त्याचा योग्य उपयोग करू शकतो, जे खूप आव्हानात्मक असू शकते”
वेंकटेश अय्यरविषयीही बोलले विक्रम राठोड
युवा अष्टपैलू वेंकटेश अय्यरला हार्दिक पांड्याच्या पर्यायी खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. वेंकटेशविषयी बोलताना राठोड म्हणाले की, “आम्हाला अजून अय्यरचे प्रदर्शन पाहायचे आहे. तो संघात नवीन आहे. त्यामुळे निवडकर्त्यांचे काम आहे, संघाची निवड करणे. त्याच्यासाठी ही एक संधी आहे. तो एक खूप चांगला खेळाडू आहे आणि आम्हा सर्वांना आशा आहे की, चांगले प्रदर्शन करेल आणि कोणत्याही परिस्थितीत संघात स्वतःची जागा बनवेल.”
दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्ध अहमदाबाध्ये खेळल्या गेलेल्या या एकदिवसीय मालिकेचा विचार केला, तर भारतायने मालिकेतील सर्व सामने जिंकले. मालिकेत भारतीय संघाने ३-० अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रिषभ पंत सलामीवीराच्या भूमिकेत दिसला असला तरी, तो अपेक्षित खेळी करू शकला नाही. पंतने त्या सामन्यात ३४ चेंडूत १८ धावा केल्या आणि बाद झाला होता.
आता एकदिवसीय मालिकेनंतर उभय संघात १६ फेब्रुवारीपासून कोलकातामध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘रिल बनवण्यासाठी द्या आयडीया’, दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होताच वॉर्नरची पोस्ट चर्चेत
वडील चालवतात सलून; आता मुलगा गाजवणार आयपीएल; वाचा राजस्थानने पारखलेल्या कुलदीपची कहाणी
आयपीएल २०२२ लिलावात १९ वर्षांखालील विश्वविजेत्या खेळाडूंवर ‘या’ कारणामुळे लागली नाही मोठी बोली?