भारतीय संघाचा (team india) अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी कोरोनाबाधित आढळला आहे. याच कारणास्तव त्याला ७ दिवसांच्या विलगीकरणात ठेवले गेले आहे. धवनला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवडले जाणाची पूर्ण शक्यता होती, पण कोरोनाची लागण झाल्यानंतर मयंक अगरवालला संघात सामील केले गेले आहे. दरम्यान, धवनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आहे.
धवनने स्वतःच्या तब्येतीविषयी माहिती देत या पोस्टमधून चाहत्यांचे आभार मानले आहे. अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केलेल्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “तुमच्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार. मी ठीक आहे आणि तुमच्याकडून मिळणाऱ्या खूप साऱ्या प्रेमासाठी विनम्र आहे.” धवनने शेअर केलेला हा फोटो त्यांच्या हॉटेल रूममधील दिसत आहे. पोस्टमधून त्याने चाहत्यांना तो सुखरूप असल्याची एकप्रकारे पुष्टी करून दिली आहे.
https://www.instagram.com/p/CZgnKLcPqQ5/?utm_source=ig_web_copy_link
बुधवारी (०२ फेब्रुवारी) झालेल्या कोरोना चाचणीत धनवचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यासोबतच युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि मध्यक्रमातील महत्वाचा युवा खेळाडू श्रेयस अय्यर यांनाही कोरोनाची लागण झाली. त्याव्यतिरिक्त राखीव खेळाडूंमध्ये सहभागी असलेल्या नवदीप सैनी आणि सपोर्ट स्टाफमधील तीन सदस्य कोरोना बाधित आढळले. त्यानंतर बोर्डाने निवेदनातून जाहीर केले की, मयंक अगरवाल संघात सामील होईल.
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यीतल एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाईल. एकदिवसीय मालिकेतील सामने ६, ९ आणि ११ फेब्रुवारीला खेळले जातील. त्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-२० मालिका कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये खेळली जाईल. टी-२० मालिकेचे सामने १६, १८ आणि २० फेब्रुवारीला खेळले जातील.
महत्वाच्या बातम्या –
मयंक अगरवाल नसेल पंजाब किंग्जचा नवा संघनायक? फ्रँचायझीचं जरा वेगळंच आहे मत
आरसीबीच्या ‘या’ खेळाडूने कोट्यवधी सोडून करियरला दिले प्राधान्य, मेगा ऑक्शनमध्ये नाही नोंदवले नाव