युवराज सिंगच्या नावावर टी20 क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम जवळपास वर्षे आहे. युवराजने इंग्लंडविरुद्ध टी20 मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम अवघ्या 12 चेंडूंत केला होता. जो नेपाळच्या दीपेंद्रसिंग ऐरीने गतवर्षी मोडला होता. दीपेंद्रने फक्त 9 चेंडूत सर्वात वेगवान टी20 अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला. युवराज सिंगचा टी20 मध्ये सर्वात वेगवान अर्धशतकांचा विक्रम मोडला गेला असेल, पण जेव्हा जेव्हा सर्वात वेगवान अर्धशतकाचा उल्लेख केला जातो तेव्हा युवीचे नाव प्रथम ध्यानात येते. भारताची ताकदवान फलंदाज रिचा घोषने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात असेच काहीसे केले आहे.
रिचा घोषने वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावले. अशाप्रकारे तिने महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 चेंडूत सर्वात वेगवान अर्धशतक करण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. रिचा घोषआधी न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईन आणि ऑस्ट्रेलियाच्या फोबी लिचफिल्डने सर्वात वेगवान अर्धशतकांचा विक्रम केला होता. या दोघींनी 18-18 चेंडूत ही मोठी कामगिरी केली होती. रिचा आता महिला क्रिकेटमध्ये संयुक्त सर्वात जलद टी20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे.
टी20 मधील सर्वात वेगवान अर्धशतक
18 चेंडू: रिचा घोष विरुद्ध वेस्ट इंडीज, 2024
18 चेंडू: फोबी लिचफिल्ड विरुद्ध वेस्ट इंडिज, 2023
18 चेंडू: सोफी डिव्हाईन विरुद्ध भारत, 2015
21 वर्षीय रिचाने 21 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 54 धावांची स्फोटक खेळी खेळली. ज्यामुळे टीम इंडिया आपली धावसंख्या 200 च्या पुढे नेण्यात यशस्वी ठरली. अशा प्रकारे टीम इंडियाने टी20 मध्ये 217/4 ही सर्वोच्च धावसंख्या बनवली. यापूर्वी, टीम इंडियाचा टी20 फॉरमॅटमधील सर्वोच्च स्कोअर 201/5 धावा होता. जो या वर्षी जुलैमध्ये बनला होता. भारताला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात रिचा घोष व्यतिरिक्त स्मृती मानधनाचेही महत्त्वाचे योगदान होते. जिने मालिकेतील सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावण्याचा मोठा पराक्रम केला. यादरम्यान तिने टी20 क्रिकेटमध्ये 500 चौकार पूर्ण करण्याचा विक्रमही केला.
हेही वाचा-
टीम इंडियाने 5 वर्षांचा दुष्काळ संपवला, वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकून विक्रम केला
शाब्बास! टी20 क्रिकेटमध्ये स्मृती मंधानानं रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
“विराट कोहली कर्णधार असता तर त्यानं अश्विनला निवृत्त होऊ दिलं नसतं”, माजी खेळाडूचा मोठा दावा