---Advertisement---

भारताविरुद्धच्या पराभवाचे पोलार्डने सांगितले कारण, म्हणाला, ‘आम्ही भारताच्या डावाच्या…’

Rohit-Sharma-Kieron-Pollard
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies t20 series) यांच्यातील टी-२० मालिका रविवारी (२० फेब्रुवारी) संपली. टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने १७ धावा राखून विजय मिळवला. भारतीय संघाने टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतील सर्वच्या सर्व सामने जिंकले आणि वेस्ट इंडीजचा एकही सामना जिंकता आला नाही. उभय संघातील शेवटच्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने मोठी प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या गोलंदाजांना धारेवर धरले आहे.

वेस्ट इंडीजने या सामन्यात प्रथम गोलंदाजी केली होती. गोलंदाजीवेळी पहिल्या १५ षटकांमध्ये वेस्ट इंडीज संघ चांगल्या स्थितीत होता, पण त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी तुफान फटकेबाजी केली. शेवटच्या पाच षटकांमध्ये त्यांनी केलेल्या प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघ १८४ धावांपर्यंत पोहोचू शकला. याच पार्श्वभूमीवर कायरन पोलार्डने विंडीज संघाच्या गोलंदाजांना निशाणा साधला आहे.

कर्णधार कायरन पोलार्ड म्हणाला की, “आम्ही भारताच्या डावाच्या १५ व्या षटकापर्यंत स्पर्धेत होतो, पण आमच्या गोलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांमध्ये ८५ धावा दिल्या. आम्ही फलंदाजीतही चांगली सुरुवात केली. निकोलसने (पूरन) त्याची निरंतरता दाखवली. रोवमॅन पॉवेलने दाखवले की, त्याला खेळपट्टीवर थांबायचे आहे. आम्हाला माहिती होते की, भारतातील मालिका अवघड होणार आहे. परंतु खेळाडूंनी ज्याप्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या त्या पाहण्यासारख्या होत्या. टी-२० मध्ये आमच्या दृष्टीने नवीन लोकांना संधी मिळत आहे आणि ते खूप मेहनत घेत आहेत.”

दरम्यान, वेस्ट इंडीजसाठी भारताचा हा दौरा खूपच निराशाजनक राहिला आहे. वेस्ट इंडीजला या दौऱ्यात एकही विजय मिळाला नाही. उभय संघात सुरुवातील खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने ३-० अशा फरकाने विजय मिळवला होता. त्यानंतर खेळळ्या गेलेल्या टी-२० मालिकेत देखील भारताने ३-० अशा फरकानेच विजय मिळवला.

उभय संघातील शेवटच्या टी-२० सामन्याचा विचार केला, तर वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाज करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ विकेट्सच्या नुकासनावार १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज संघ ९ विकेट्सच्या नुकासनावार १६७ धावांपर्यंत पोहोचू शकला. परिणामी भारतातने १७ धावा शिल्लक ठेऊन विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या –

टीम इंडिया ६ वर्षांनी बनली टी२० क्रिकेटमध्ये ‘नंबर वन’; रोहित ‘असा’ पराक्रम करणारा धोनीनंतर दुसराच

रोहित शर्माने स्टाईलमध्ये अंपायर बिली बाउडेनलाही टाकले मागे, DRS मागतानाचा Video तुफान व्हायरल

‘रोहित अन् संघा’चा विजयी धमाका! वनडेनंतर टी२०तही तगड्या वेस्ट इंडिजचा ३-० ने व्हाईटवॉश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---