भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील शतकांचा दुष्काळही संपवला आहे. मात्र, विराटला मागील दोन वर्षांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये खास प्रदर्शन करता आले नाहीये. अशात 12 जुलैपासू सुरू होत असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील त्याच्या प्रदर्शनावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. विशेष म्हणजे, विराटच्या कसोटीतील खराब कामगिरीमुळे त्याची सरासरीही 50च्या खाली आली आहे. असे असूनही विराट या कसोटी मालिकेत मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतो. चला तर त्याविषयी जाणून घेऊयात…
मोठा विक्रम करण्याची संधी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) दोन्ही डावात मिळून 150 धावा बनवण्यात यशस्वी झाला, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 5व्या स्थानी पोहोचेल. विराटच्या नावावर आतापर्यंत 25,385 धावा आहेत. तसेच, त्याच्या पुढे असणाऱ्या जॅक कॅलिस याच्या नावावर 25,534 धावा आहेत.
याव्यतिरिक्त विराट 25 धावा करण्यासोबतच भारतीय संघासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा 5वा फलंदाज बनेल. विराटला कसोटीत 8500 धावा करण्यासाठी फक्त 21 धावांची गरज आहे. तसेच, या कसोटी मालिकेदरम्यान विराटने 13 चौकार मारले, तर त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात खेळताना 500 चौकारांची नोंद होईल.
एक शतक ठोकताच विराट करेल ब्रॅडमन यांच्या शतकांची बरोबरी
कसोटी क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर अद्याप 28 शतकांची नोंद आहे. जर त्याने या कसोटी मालिकेत एक शतक केले, तर तो ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman) यांच्या शतकांची बरोबरी करेल. यासोबतच विराट सर्वाधिक कसोटी शतके मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 10व्या स्थानी विराजमान होईल. (ind vs wi virat kohli can break these record in first test against west indies lets read)
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार रोहितला पुणेकर ऋतुराजची फुल गॅरेंटी, तोंडभरून कौतुक करत म्हणाला, ‘त्याने दाखवून दिलंय…’
मोठी बातमी! पाकिस्तानला जाणार नाही टीम इंडिया आणि जय शाह, कुठे होणार IND vs PAK सामना?