दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील निराशाजनक प्रदर्शनानंतर भारतीय संघ आता मायदेशात वेस्ट इंडिजशी (IND vs WI) दोन हात करणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध ३ सामन्यांची वनडे (ODI Series) आणि ३ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध जेव्हा भारताचा संघ पहिला वनडे सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरेल, तेव्हा सर्वांच्या नजरा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर असतील. वनडे मालिकेत मोठा विक्रम करण्याची नामी संधी विराटकडे असणार आहे.
विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत ३९ वनडे सामने खेळताना त्यातील ३८ डावांमध्ये फलंदाजी करत २२३५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ७२.०९ इतकी राहिली आहे. तसेच वेस्ट इंडिजविरुद्ध त्याच्या बॅटमधून ११ अर्धशतकांसह ९ शतकेही निघाली आहेत. ही वनडे क्रिकेटमध्ये कोणत्या फलंदाजाने एका संघाविरुद्ध केलेली सर्वाधिक शतके आहेत.
व्हिडिओ पाहा- द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण
या बाबतीत विराट महान भारतीय फलंदाज सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याच्यासह संयुक्तपणे अव्वलस्थानी आहे. मास्टर ब्लास्टर सचिनने १९९१ ते २०१२ दरम्यान वनडे स्वरुपात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ७१ सामने खेलताना ९ शतके केली होती.
त्यामुळे जर विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध एक जरी शतक ठोकले तरी तो एका देशाविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके करण्याच्या विक्रमात सचिनला (Most ODI Centuries Against An Opponent) मागे सोडेल. तसेच तो हा भीमपराक्रम करणारा केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील पहिलावहिला फलंदाज बनेल.
असे असले तरीही, विराटसाठी हा विक्रम मोडणे सोपे काम नसेल. कारण रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फलंदाजांची बॅट गेल्या काही महिन्यांपासून थंडावलेली दिसते आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावल्यानंतर अद्याप तो धावांची शंभरी गाठू शकलेला नाही. त्यामुळे विराट आता तरी आपल्या शतकाचा दुष्काळ संपवत सचिनचा हा विक्रम मोडतो की नाही, हे पाहावे लागेल.
वेस्ट इंडीजविरुद्ध वनडे मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ मध्येही धोनीच असणार सीएसकेचा कॅप्टन? जडेजाला पाहावी लागणार वाट, वाचा सविस्तर
मी कसा काय पडलो? मैदानावर उलट धावताना धपाक्कन कोसळला अंपायर, स्क्रिनवर सर्वांनीच पाहिलं
हेही पाहा-