भारतीय संघाने झिम्बाब्वे दौऱ्यात जबरदस्त प्रदर्शन केले. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान संघाला भारताने क्लीन स्वीप (०-३) दिला. या दौऱ्यासाठी भारतीय निवडकर्त्यांनी १५ सदस्यीय संघ निवडला होता. परंतु मेडिकल टीमने केएल राहुलला हिरवा कंदील दाखवल्यानंतर त्यालाही संघात सामील केले गेले. भारतीय संघाचे या दौऱ्यात चांगले राहिले असले, तरी काही प्रमुख खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी दिग्गज आकाश चोप्रा याने काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि शाहबाज अहमद (Shahbaz ahmed) या तिघांना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडले गेले होते. परंतु वनडे मालिकेतील एकाही सामन्यात त्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही. राहुल त्रिपाठी भविष्यात भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, असे सांगितले जाते. मात्र, अद्याप त्याला पदार्पणाची संधीच मिळाली नाहीये. तर दुसरीकडे शिखर धवन आणि केएल राहुल संघात असल्यामुळे ऋतुराजला बेंचवर बसण्याची वेळ आली. गायकवाड आणि त्रिपाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी नसल्यामुळे आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, “जे लोक या सामन्यासाठी उत्सुक होते, ते म्हणाले की, तुम्ही ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठीला खेळवले पाहिजे होते. सर्वांना संधी दिली पाहिजे, पण असे काहीच झाले नाही. प्रश्न हा आहे की, तुम्ही राहुल त्रिपाठीला संघात निवडले, पण त्याला खेळण्याची संधी दिली नाही. असेच करायचे होते, तर त्याला निवडलेच कशासाठी?”
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, “शेवटच्या सामन्यात तुम्ही त्याला संधी देऊ शकत होता, पण दिली नाही. ऋतुराज गायकवाडसोबत देखील असेच झाले. तुम्ही फलंदाजी क्रम एकसारखाच ठेवला. केएळ राहुल आणि शिखर धवन डावाची सुरुवात करत होते. तसेच त्यानंतर शुबमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा खेळत होते.”
दरम्यान, उभय संघातील या मालिकेती सर्व सामने हरारे स्पोर्ट्स ग्राउंडवर खेळला गेले. पहिल्या सामना भारताने १० विकेट्स राखून, तर दुसरा सामना ५ विकेट्स राखून विजय मिळवला. त्यानंतर शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले, पण विजय मात्र विजय मिळवू शकले नाहीत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराट की बाबर! आशिया चषकात कोण ठरणार सर्वोत्तम? जाणून घ्या आकडेवारी
VIDEO: हार्दिकच्या अंगात संचारला बुमराह! पंड्याने शेअर केलेल्या व्हिडिओवर ‘बुम-बुम’चा खास रिप्लाय
VIDEO: ‘शुबमनच्या शतकामागे युवराज सिंगचा हात!’ स्वत: गिलने सांगितले गुपित





