---Advertisement---

या आयपीएल खेळाडूंची लागली लाॅटरी, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश

On: मंगळवार, जुलै 2, 2024 3:31 PM
---Advertisement---

आगामी झिम्बाब्वे दाैऱ्यासाठी बीसीसीआय कडून संघात पहिल्या दोन टी20 सामन्यांसाठी बदल करणायत आले आहे. टी20 विश्वचषक संघात शामील असलेल्या सॅमसन, दुबे आणि जयस्वाल यांच्या जागी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आगामी झिम्बाब्वे दाैऱ्यासाठी रवाना झाला आहे. या दरम्यान बीसीसीआयकडून मोठी बातमी समोर येत आहे. टी20 विश्वचषक विजयी संघासोबत असलेल्या संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबेच्या जागी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांना पहिल्या 2 टी20 सामन्यांसाठी संघात शामील केले आहे. वर्क लोड मॅनेजमेंट मुळे  सॅमसन, जयस्वाल आणि दुबे हे तिघे जण उशिरा झिम्बाब्वेला पोहचतील.

भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध 5 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना 6 जुलै रोजी होणार असून शेवटचा सामना 14 जुलैला होईल. या दाैऱ्यात टीम इंडियाची हेड कोचची जबाबदारी व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांच्याकडे असणार आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारताचा संघ:
शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षित राणा 

तत्तपूर्वी, साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा तिघांनी आयपीएल 2024 मध्ये शानदार कामगिरी केली होती. अलकॅप्ड हर्षित राणाने कोलकाता नाईट रायर्डस कडून अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने आयपीएल मधील 13 सामन्यांत 19 विकेट्स घेतल्या होत्या.

महत्तवाच्या बातम्या-

भारतीय संघानंतर राहुल द्रविड आता आयपीएलमध्ये कोचिंग सांभाळतील? आरसीबीसह या 3 टीम आहेत शर्यतीत
प्रशिक्षक भावूक; टीम इंडियाला निरोप देण्यापूर्वी राहुल द्रविडने केले अंतिम भाषण
“या संघाचा हिस्सा असल्याचा…” पीएम मोदींना बोलताना विराटच्या भावना समोर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---