---Advertisement---

पूजा वस्त्राकरने ठोकलेला सिक्सर थेट स्टेडिअममधील प्रेक्षकाच्या हातात; ठरला आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार

Pooja-Vastrakar
---Advertisement---

आयसीसी महिला विश्वचषक २०२२मधील सामन्यांमध्ये आतापर्यंत खेळण्यात आलेल्या सामन्यांमध्ये एकापेक्षा एक दृश्ये पाहायला मिळाले आहेत. असेच काहीसे दृश्ये शनिवारी (१९ मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेल्या १८व्या सामन्यातही पाहायला मिळाले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाला २७८ धावांचे आव्हान दिले होते. यावेळी भारताकडून यास्तिका भाटिया, मिताली राज आणि हरमनप्रीत कौरने शानदार अर्धशतक झळकावले. मात्र, यादरम्यान फलंदाजी करताना पूजा वस्त्राकरने २८ चेंडूत २ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने ३४ धावा ठोकल्या. पूजाच्या या २ षटकारांपैकी १ षटकार महिला विश्वचषक २०२२मधील सर्वात लांब षटकार ठरला. आता या षटकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

पूजाने ४९ व्या षटकाच्या ५व्या चेंडूवर षटकार ठोकला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज मेगन शटने टाकलेला चेंडू पूजाच्या (Pooja Vastrakar) पारड्यात पडला आणि पूजाने लाँग ऑनच्या दिशेने जोरदार षटकार ठोकला. हा षटकार ८१ मीटर दूर गेला. विशेष म्हणजे, मैदानात उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाने हा षटकार झेलला. यासोबतच पूजाने ठोकलेला हा षटकार या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार ठरला. यापूर्वी भारताच्याच स्म्रीती मंधानाने (Smriti Mandhana) ८० मीटर लांब षटकार ठोकला आहे. आयसीसीने हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/CbRZpcHlgT7/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

भारतीय संघाच्या डावाबद्दल बोलायचं झालं, तर संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. मंधाना ४, तर शेफाली वर्मा १२ धावांवर तंबूत परतल्या. २८ धावांवर भारताने २ विकेट्स गमावल्या होत्या. त्यावेळी यास्तिका भाटियाची साथ देण्यासाठी आलेल्या कर्णधार मिताली राजने शतकी भागीदारी करत भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. यास्तिकाने यावेळी ५९, तर मितालीने ६८ धावांची खेळी केली. हे मितालीचे वनडे कारकिर्दीतील ६३वे अर्धशतक होते.

मिताली या विश्वचषकात सर्वाधिक वेळा ५०हून अधिक धावा करणारी खेळाडूही बनली आहे. मितालीने विश्वचषकात १२वेळा ५०पेक्षा अधिक धावसंख्या केली आहे. शतकी भागीदारी करणाऱ्या यास्तिका आणि मितालीचे एकापाठोपाठ एक विकेट गेल्यानंतर असे वाटले की, भारतीय संघ २५० धावांचा टप्पाही पार करू शकणार नाही. मात्र, उपकर्णधार हरमनप्रीत कौरने ४७ चेंडूत ५७ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या २७७पर्यंत पोहोचवली. मात्र, शेवटी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला ६ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. हा भारतीय संघाचा महिला विश्वचषक २०२२मधील तिसरा पराभव होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---