न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ (ICC Women ODI World Cup 2022) मध्ये शनिवारी (१९ मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात १८ वा सामना झाला. या सामन्यात भारताची अनुभवी मध्यमगती गोलंदाज झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिच्या नावे नव्या आणि मोठ्या विक्रमाची नोंद झाली. तिच्यापूर्वी क्रिकेटविश्वातील कोणत्याही गोलंदाजाला असा पराक्रम करता आलेला नाही. विशेष म्हणजे, तिने ना बॉल, ना बॅट हाती घेताही हा विक्रम केला आहे. हा विक्रम संबंधित आहे, सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या महिला गोलंदाजांशी (200 ODI Played Women Bowler).
आयसीसी महिला विश्वचषक २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झूलन तिच्या वनडे कारकिर्दीतील २०० वा सामना खेळत आहेत. इतके वनडे सामने खेळणारी ती जगातील पहिलीच महिला गोलंदाज बनली आहे. यापूर्वी तिने १९९ वनडे सामने खेळताना २५० विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान ३१ धावांवर ६ विकेट्स ही तिची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. यादरम्यान तिने २ वेळा एका वनडे सामन्यात ५ विकेट्स घेण्याची कमालही केली आहे.
मितालीनंतर दुसरी खेळाडू बनली झूलन
ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०० वा वनडे सामना खेळणारी झूलन पहिली महिला गोलंदाज तर बनलीच आहे, याबरोबरच ती महिला क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा केवळ दुसरी क्रिकेटपटूही ठरली आहे. झूलनपूर्वी भारतीय महिला वनडे संघाची कर्णधार मिताली राज हिने २०० वनडे सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना मितालीच्या कारकिर्दीतील २२९ वा सामना होता.
???? ???????????????????????? ???????????? ???????? ????????????????????????????! ???? ????
Congratulations to the legendary #TeamIndia pacer @JhulanG10 as she plays her 2⃣0⃣0⃣th WODI! ???? ???? #CWC22 | #INDvAUS pic.twitter.com/jQvP25FwoX
— BCCI Women (@BCCIWomen) March 19, 2022
झूलन नुकतीच बनलीय सर्वाधिक वनडे घेणारी पहिली गोलंदाज
तिने इंग्लंडविरुद्ध विश्वचषक सामन्यात एक विकेट घेत वनडे क्रिकेटमधील २५० विकेट्सचा आकडा गाठला होता. असा पराक्रम करणारी ती जगातील पहिली आणि एकमेव महिला (First Indian Player) गोलंदाज बनली होती. झुलनने हा विक्रम करत भारताचे महान पुरुष क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांची बरोबरी केली होती. कपिल देव यांनी पुरुषांच्या क्रिकेटमध्ये सर्वप्रथम २५० वनडे विकेट्स घेण्याची किमया साधली होती. आता महिला क्रिकेटमध्ये झुलन गोस्वामीने हा किर्तीमान केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
…अन् ‘त्याने’ सबंध क्रिकेटविश्वाला दाखवून दिले की आपण मुरलीधरनपेक्षा कमी नव्हतो
बरोबर १५ वर्षांपुर्वी १२७ किलो वजनाच्या क्रिकेटपटूने घेतला होता उथप्पाचा नेत्रदिपक झेल, पाहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलियन दिग्गजाला बघायचाय ‘हिटमॅन’चा राग; म्हणाला, ‘रोहितला कठीण जाणारंय…’