शनिवारी (दि. 9 डिसेंबर) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात दुसरा टी20 सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला. तसेच, इंग्लंड महिलांनी 3 सामन्यांची टी20 मालिका नावावर केली. त्यांनी मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. या सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर निराश झाली. तिने फलंदाजांना दोष देत म्हटले की, संघाचे फलंदाज चेंडूचा अचूक अंदाज घेऊ शकले नाहीत.
या सामन्यात भारतीय संघाने (Team India) नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. यावेळी भारतीय महिला (Indian Women Team) संघाचा डाव 16.2 षटकात अवघ्या 80 धावांवर संपुष्टात आला. हे आव्हान इंग्लंड महिला (England Women Team) संघाने अवघ्या 11.2 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात 82 धावा करत पार केले. तसेच, सामना 4 विकेट्सने नावावर केला.
काय म्हणाली हरमन?
या पराभवानंतर हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने मोठे विधान केले. ती म्हणाली, “आम्हाला नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खेळायचे असते, पण दुर्दैवाने आमचे काही फलंदाज चेंडूचा अचूक अंदाज लावू शकले नाहीत. याव्यतिरिक्त इंग्लंडने खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्यांनी आम्हाला मोकळेपणाने खेळू दिले नाही.”
ती पुढे म्हणाली, “जर आम्ही आणखी 30-40 धावा केल्या असत्या, तर यामध्ये मोठे अंतर निर्माण झाले असते. मात्र, मला माझ्या संघाचा अभिमान आहे. आम्ही शेवटपर्यंत हार मानली नाही.”
उभय संघातील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी (दि. 10 डिसेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघ क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न करेल.
भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताकडून जेमिमा रॉड्रिग्ज सर्वाधिक धावा करण्यात यशस्वी झाली. तिने 33 चेंडूंचा सामना करताना 30 धावा केल्या. यामध्ये 2 चौकारांचाही समावेश होता. तिच्याव्यतिरिक्त फक्त स्मृती मंधाना हिला 10 धावा करता आल्या. इतर एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौर (Skipper Harmanpreet Kaur) हिला फक्त 9 धावांवर समाधान मानावे लागले.
दुसरीकडे, इंग्लंडच्या डावात गोलंदाजी करताना भारताकडून रेणुका ठाकूर आणि दीप्ती शर्मा चमकल्या. त्यांनी प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या. तसेच, सायका इशाक आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (ind w vs eng w skipper harmanpreet kaur on defeat said unfortunately some of our batsmen read here)
हेही वाचा-
लो स्कोरिंग सामन्यात इंग्लंडचा दिमाखात विजय! मायदेशातीत टी-20 मालिकेत भारत पराभूत
भारतीय संघावर मान खाली घालण्याची वेळ! इंग्लंडकडून 80 धावात सुपडा साफ