---Advertisement---

जिंकलो रे! भारताने श्रीलंकेला लोळवलं, उंचावली महिला आशिया चषकाची सातवी ट्रॉफी

On: शनिवार, ऑक्टोबर 15, 2022 3:18 PM
Smriti-Mandhana
---Advertisement---

महिला आशिया चषक 2022मधील अंतिम सामना शनिवारी (दि. 15 ऑक्टोबर) भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडला. सिल्हेट मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने 8 विकेट्सने हा सामना जिंकला. या सामन्यात गोलंदाज आणि फलंदाज अशा दोन्ही विभागांनी मोलाचे योगदान दिले. यासोबतच भारताने सातव्यांदा महिला आशिया चषकाची ट्रॉफी उंचावली.

या सामन्यात श्रीलंका महिला संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना श्रीलंका संघाने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत फक्त 65 धावा चोपल्या होत्या. हे आव्हान भारतीय महिलांनी 8.3 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केले आणि सामना खिशात घातला. अशाप्रकारे भारतीय संघाने हा सामना 8 विकेट्सने आपल्या खिशात घातला.

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना सलामी फलंदाज स्म्रीती मंधना (Smriti Mandhana) हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 25 चेंडूंचा सामना करताना नाबाद 51 धावा करत अर्धशतक साकारले. या धावा करताना तिने 3 षटकार आणि 6 चौकारही मारले. यादरम्यान तिचा स्ट्राईक रेट 204 इतका होता. तिच्याव्यतिरिक्त हरमनप्रीत कौर हिने नाबाद 11 धावा केल्या. या दोघींच्या फटकेबाजीमुळे भारताने हा कमी आव्हानाचा सामना सहजरीत्या आपल्या नावावर केला.

यावेळी श्रीलंका संघाकडून गोलंदाजी करताना इनोका रणवीरा आणि कविशा दिलहारी यांनी प्रत्येकी एक विकेट आपल्या नावावर केली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाज करताना श्रीलंका संघाकडून इनोका रणवीरा हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने 18 चेंडूंची खेळी केली. तिच्याव्यतिरिक्त ओशादी रणशिंगे हिने 13 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त इतर एकाही फलंदाजाला 10 धावांची संख्या गाठता आली नाही.

यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना रेणुका सिंग हिने सर्वोत्तम गोलंदाजी करत सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 3 षटके गोलंदाजी करताना 5 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनीही प्रत्येकी दोन विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पैसाच पैसा! फक्त इंस्टाग्रामवरून विराटने कमावलेत इतके कोटी; त्याच्यापुढे केवळ हे दोघे
अवघ्या 65 धावांवर ढासळली श्रीलंकन टीम, भारतीय संघ सातव्यांदा उंचावणार आशिया चषक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---