आशिया चषक 2023 चा पाचवा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात पल्लेकेले येथे होणार आहे. याही सामन्यात पावसाची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे पूर्णपणे होऊ शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना भारताने 266 धावा केल्या. मात्र यानंतर पाकिस्तानी संघ फलंदाजीसाठी मैदानात येऊ शकला नाही. आता भारत आणि नेपाळ सामन्यातही पाऊस पडूण्याची दाट शक्यता आहे.
श्रीलंकान हवामान खात्याच्या मते, सोमवारी पल्लेकेलेमध्ये दिवसाची सुरुवात हलक्या पावसाने होऊ शकते. सकाळी आठ वाजता पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरू राहील. दुपारी 2 वाजता मुसळधार पाऊस पडू शकतो. भारत आणि नेपाळ यांच्यात दुपारी 3 वाजल्यापासून सामना रंगणार आहे. त्यासाठी दुपारी अडीच वाजता नाणेफेक होणार आहे. पण जर पाऊस पडला तर नाणेफेकीला उशीर होऊ शकतो. मुसळधार पाऊस पडल्यास सामना रद्दही होऊ शकतो. पावसाची शक्यता लक्षात घेऊन षटकेही कमी करण्यतची शक्यता आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. भारत-पाक सामन्यापूर्वी खूप पाऊस पडला. यानंतर टॉसच्या वेळी आकाश निरभ्र होते. पण नंतर पाऊस पडला. काही काळ सामना थांबवण्यात आला. अशा प्रकारे भारताने ऑलआऊट होईपर्यंत 266 धावा केल्या. मात्र डाव पहिला संपल्यानंतरही पाऊस थांबला नाही. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकले नाहीत.
यादरम्यान भारतीय संघने 66 धावांवर 4 गडी गमावले होते. परंतु, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या दोघांनी भारतीय संघाची भार संभाळला.ईशान 81 चेंडूत 82 तर हार्दिक 90 चेंडूत 87 धावा करण्यात यशस्वी झाला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. नेपाळला हरवून पाकिस्तानने आधीच 2 गुण मिळवले होते. त्यामुळे पाकिस्तान संघाने 3 गुणांसह सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे. सुपर-4 मध्ये जाण्यासाठी भारताला नेपाळचा पराभव करावा लागेल. (indi vs nepal match weather update asia cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
रोहित-विराटसह भारतीय संघाच्या फलंदाजांना गावसकरांनी सुनावले, म्हणाले ‘श्रेयस…’
‘मैत्री बाहेर ठेवायची…’, IND-PAK खेळाडूंना चेष्टा-मस्करी करताना पाहून भडकला गंभीर, वाचाच