आशिया चषकातील चौथा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात शनिवारी रंगला होता. परंतु, पावसाने या सामन्यात व्यथ्य आणले. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारतीय संघाच्या वरच्या फळीतल्या फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या चौघांनाही काही खास करता आले नाही. यावर आता भारतीय संघाचे महान दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमातील वृत्तांना दिलेल्या मुलाखतीत सुनील गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले की, “रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना त्यांच्या पायाचा चांगला उपयोग करता आला असता. रोहितचया बॅट आणि पॅडमध्ये खूप अंतर होतं. श्रेयस अय्यर थोडा दुर्दैवी होता कारण त्याचा फटका खूप चांगला होता आणि जर चेंडू थोडासाही सरकला असता तर तो चौकार होऊ शकला असता. शुभमन गिल त्या लयीत दिसला नाही. तो त्याचा नैसर्गिक खेळ खेळला असे वाटले नाही. तो बराचसा अडकलेला दिसत होता. आपल्याला माहीत असलेला शुभमन गिल सारखा दिसत नाही.”
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकामधील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 48.5 षटकांत 266 धावा केल्या. मात्र, पावसामुळे पाकिस्तानला फलंदाजीची संधी मिळाली नाही. जवळपास 2 तास वाट पाहून देखिल पाऊस थांबला नाही. यामुळे सामना रद्द करावा लागला. या सामन्यात भारतीय संघाच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी खूपच खराब फलंदाजचे प्रदर्शण केले. हार्दिक पंड्या आणि ईशान किशन यांनी शानदार भागीदारी केली नसती तर कदाचित भारतीय संघाला मोठी धावसंख्या करता आली नसती.
दरम्यान भारतीय संघाचे 66 धावांवर 4 खेळाडू तंबूत परतले असताना ईशान आणि हार्दिकने भारतीय संघाचा भार संभाळाला. ईशान किशनने 82 चेंडूत 81 धावाल केल्या तर हार्दिक 90 चेंडूत 87 धावा करूण परतला. (sunil gavaskar talk about rohit sharma and virat kohli batting)
महत्वाच्या बातम्या-
विराट की बाबर, कोणाला निवडशील? पाकिस्तानच्या सुंदरीने दिलं मन जिंकणारं उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
बिग ब्रेकिंग! दिग्गज क्रिकेटरचे 49व्या वर्षी निधन, पत्नीने सोशल मीडियावरून दिली माहिती