भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कुणापासून लपलेला नाही. पण खेळ आणि संगीताच्या माध्यमातून ते कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला आहे. पाकिस्तान आणि भारतीय क्रिकेटपटूंच्या मैत्रीचे अनेक किस्सेही प्रसिद्ध आहेत. फॅन्सचा विचार केला तर सीमा आणि धर्म कुठेच दिसत नाहीत. विराट कोहलीची अशीच एक चाहती पाकिस्तानाता आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. ती आशिया चषतका भारतविरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी गेली होती. मात्र, हा महासामना रद्द झाला. यावर या सुंदरीने प्रतिक्रीया दिली आहे. तिचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी सुंदरी म्हाणाली, की “विराट कोहली (Virat Kohli) माझा आवडता खेळाडू आहे. मी खास त्याच्यासाठी सामना पाहायला आले होते कारण मला त्याला बघायचे होते. मला त्याच्याकडून शतकाची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.
दरम्यान तिला प्रश्न विचारला की, तुम्ही पाकिस्तान आणि विराट कोहली या दोघांनाही सपोर्ट करत आहात का? याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान सुंदरीने तिच्या गालावर काढलेले भारत आणि पाकिस्तानचे झेंडे दाखवले. बघा हा पाकिस्तान आहे, हा भारत आहे आणि दोघेही एकत्र आहेत, असे सांगितले. चाहतीच्या या उत्तरावर तिच्या शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने ती फक्त विराटला सपोर्ट करत असल्याचे सांगितले.
सुंदरी उत्तर देत म्हाणाली की, “काका, शेजाऱ्यांवर प्रेम करणे वाईट गोष्ट नाही ना?” याशिवाय तिला जेव्हा विचारण्यात आले की ती बाबर आणि विराटमध्ये कोणाची निवड करेल तेव्हा तिने कोहलीचे नाव घेतले.”
A Virat Kohli fan come from Pakistan to see Kohli's batting in Sri Lanka in Asia Cup.
King Kohli – The Face of World Cricket, He is everyone's favourite! pic.twitter.com/aUaiTmwSYn
— Tanuj Singh (@ImTanujSingh) September 3, 2023
कोण आहे ही चाहती?
ही पाकिस्तानी सुंदरी अनेकदा तिच्या सोशल मीडियावर विराट कोहली आणि भारतावरील प्रेम दाखवते. सोेशल मीडियवर तिचे नाव लव खानी आहे पण खरे नाव फिजा खान आहे. फिजा खानला हिंदी गाण्यांची खूप आवड आहे. सोशल मीडियावर ती लव खानी या नावाने प्रसिद्ध आहे. फिजाचे इन्स्टाग्रामवर अडीच लाख फॉलोअर्स आहेत. ती दुबईला राहते. (virat kohli pakistani fan girl she say’s my heart broke asia cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
फक्त खेळ बदलला! भारताकडून पाकिस्तानचा दारून पराभव
बिग ब्रेकिंग! दिग्गज क्रिकेटरचे 49व्या वर्षी निधन, पत्नीने सोशल मीडियावरून दिली माहिती