क्रिकेटविश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. झिम्बाब्वे संघाचा माजी दिग्गज कर्णधार हीथ स्ट्रीक याचे निधन झाले आहे. रविवारी (दि. 03 सप्टेंबर) पहाटे क्रिकेटपटूने अखेरचा श्वास घेतला. तो अवघ्या 49 वर्षांचा होता. त्याच्या निधनाची माहिती पत्नी आणि वडिलांनी दिली आहे. खरं तर, मागील काही दिवसांपूर्वीच त्याच्या निधनाची अफवा उडाली होती, ज्यावर दिग्गजाने रागही व्यक्त केला होता. मात्र, आता त्याच्या निधनामुळे क्रिकेटविश्वाचे मोठे नुकसान झाले असून चाहते आणि क्रिकेटपटू त्याच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
पत्नीने दिली निधनाची माहिती
हीथ स्ट्रीक याची पत्नी नेडिन स्ट्रीक (Nadine Streak) हिने फेसबुक अकाऊंटवर पोस्ट शेअर करत पतीच्या निधनाची माहिती दिली. तिने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, “आज, 3 सप्टेंबर 2023च्या पहाटे, माझ्या आयुष्यातील प्रेम, माझ्या गोड मुलांचा बाबा, देवदूतांसह निघून गेला. त्याला शेवटचे दिवस घरीच घालवायचे होते. तो अखेरच्या दिवसात कुटुंब आणि नातेवाईकांसोबत राहिला.”
हीथ स्ट्रीक याने झिम्बाब्वे क्रिकेट संंघाकडून 65 कसोटी सामने आणि 189 वनडे सामने खेळले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून खेळणाऱ्या स्ट्रीकच्या नावावर कसोटीत एकूण 216 विकेट्सची नोंद आहे. यादरम्यान त्याने एका डावात 16 वेळा 4 विकेट्स, तर 7 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच, वनडे क्रिकेटमध्येही हीथ स्ट्रीकने गोलंदाजीतून चांगली कामगिरी केली होती.
हीथ स्ट्रीकने वनडे क्रिकेटमध्ये 29.82च्या सरासरीने आणि 4.51च्या इकॉनॉमी रेटने 239 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने 7 वेळा एका डावात 4 विकेट्स, तर एक वेळा 5 विकेट्स घेतल्या होत्या. याव्यतिरिक्त त्याने बॅटमधूनही आपला दम दाखवून दिला होता. कसोटीत त्याच्या नावावर 1990 धावा, तर वनडेत 2943 धावांची नोंद आहे. स्ट्रीकने कसोटीत 1 शतक आणि 11 अर्धशतके ठोकली. तसेच, वनडेत त्याने 13 अर्धशतके कुटली होती.
नेतृत्वाची आकडेवारी
सन 2000मध्ये झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने हीथ स्ट्रीक याच्याकडे कसोटी आणि वनडे संघांच्या नेतृत्वाची धुरा सोपवली होती. स्ट्रीकच्या नेतृत्वात झिम्बाब्वेने 21 कसोटी सामन्यात 4 विजय मिळवला, तर 11 सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच, 6 सामने अनिर्णित राहिले. वनडेत स्ट्रीकने 68 सामन्यात संघाचे नेतृत्व केले आणि यात 47 सामन्यात पराभव पत्करावा लागला. संंघाने फक्त 18 सामनेच जिंकले. (shocking heath streak passes away at 49 is wife nadine confirms on social media)
हेही वाचा-
मराठीत माहिती- क्रिकेटर मोहम्मद शमी
फक्त खेळ बदलला! भारताकडून पाकिस्तानचा दारून पराभव
वर्ल्डकप 2023 मधून राहुलचा पत्ता कट? ईशानच्या पकिस्तानविरुद्धच्या दमदार खेळीमुळे क्रिकेट विश्वात चर्चा