डावखुरा सलामीवीर प्रथम सिंगने दुलिप ट्रॉफीच्या (Duleep Trophy) तिसऱ्या दिवशी शानदार शतक झळकावून भारत ड संघाला चकित केले. भारत अ संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शुबमन गिलच्या जागी आलेल्या प्रथमने (Pratham Singh) एकाच षटकात एक षटकार आणि नंतर सलग दोन चौकार मारून शतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी प्रथमने 189 चेंडूत 122 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये 12 चौकार आणि एक षटकार सामील होता. 32 वर्षीय प्रथमचे प्रथमश्रेणी क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे.
भारत अ संघाच्या दुसऱ्या डावातील 49 व्या षटकात प्रथमने वेगवान गोलंदाज विद्वत कवीरप्पाच्या सामना केला. प्रथम सिंगने मिड-विकेटवर कविरप्पाला षटकार मारून षटकाची धमाकेदार सुरुवात केली. पुढचे तीन चेंडू निर्धाव खेळल्यानंतर त्याने सलग दोन चौकार मारून षटक संपवले आणि आपले शतक पूर्ण केले. प्रथम सिंगचे शानदार शतक आणि मयंक अग्रवाल आणि तिलक वर्मा यांच्या मौल्यवान खेळ्यांच्या जोरावर भारत अ संघाने उपाहारापर्यंत दोन गडी गमावून 260 धावा केल्या होत्या. यासह भारत ड संघावर 367 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात 290 धावा केल्यानंतर भारत अ संघाने दुसऱ्या दिवशी भारत ड संघाला केवळ 183 धावांत गुंडाळले होते.
डावखुरा फलंदाज प्रथम अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर, भारतातील सर्वोच्च व्यवसाय शाळा ‘ISB’ मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झालेला. परंतु क्रिकेटची आवड त्याला शेवटी इंडियन प्रीमियर लीगमध्ये घेऊन गेली. दिल्लीच्या या खेळाडूने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रेल्वेसाठी चांगली कामगिरी करणे सुरूच ठेवले. दोन वर्ष आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या गुजरात लायन्सने त्याची निवड केली होती. मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, 2022 मध्ये झालेल्या लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने त्याला विकत घेतलेले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान सामन्यात मोठा राडा! मैदानावरच भिडले दोन्ही संघांचे खेळाडू
मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलेल्या ‘या’ गोलंदाजापुढे स्टार फलंदाज गार
“भारतीय गोलंदाज इतरांपेक्षा वेगळे…” नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य