एमर्जिंग एशिया कप 2023च्या 12व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमने सामने आले होते. भारताने हा सामना 8 विकेट्नसे जिंकला. राजवर्धन हंगारगेकर (Rajvardhan Hangargekar) आणि साई सुदर्शन (Sai Sudarshan) हे खेळाडू या विजयात सर्वात महत्वाची भूमिका बजावणारे ठरले. 206 धावांचे लक्ष्य गाठताना साई सुदर्शनने वैयक्तिक शतक करत अवघ्या 36.4 षटकात भारत अ संघाला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी पर्थम फलंदाजी करण्यासाठी पाकिस्तान संघ आला आणि राजवर्धन हंगरगेकर याच्या भेदक गोलंदाजीपुढे टिकू शकला नाही. हंगरगेकरने 8 षटकात 42 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. परिणामी पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी करताना 48 षटकात 205 धावा करून सर्वबाद झाला होता.
प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान अ संघाला आपली 50 षटकेही खेळता आली नाही. कासिम अक्रम याने पाकिस्तानसाठी सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. तर सलामीवीर साहिबजादा फरहान याने 35 धावांची खेळी केली. त्याव्यतिरिक्त पाकिस्तानचा एकही फलंदाज 30 धावांचा आकडा पार करू शकला नाही. भारतासाठी हंगरगेकरला मानव सुथार (Manav Suthar) यांची चांगली साथ मिळाली. मानवने 10 षटकात 36 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या.
भारतीय संघ फलंदाजीला आल्यानंतर सलमीवीर अभिषेक शर्मा 20 धावा करून बाद झाला. पण तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या निकिन जोशी याने साई सुदर्शनची चांगली साथ दिली. निकिनने 64 चेंडूत 53 धावांची खेळी केली आणि यष्टीरक्षक मोहम्मद हारिस याच्या चेंडूवर तो बाद झाला. साई सुदर्शनने 110 चेंडूत 104 धावांची नाबाद खेळी केली. यात 10 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. कर्णधार यश धूल () त्याच्या साथीला शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिला. यशने 19 चेंडूत 20* धावा केल्या. एमर्जिंक एशिया कपमधील आपला पुढचा सामना भारताला शुक्रवारी (21 जुलै) बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे. (INDIA A DEFEATED PAKISTAN A BY 8 WICKETS!!!! 5 wickets by Hangargekar & 104* runs by Sai Sudharsan)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सामना रोमांचक वळणावर! पाचच्या दिवशी दोन्ही संघ विजयासाठी भिडणार
आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये भारतीयांची हवा! कर्णधार रोहितला मिळाले मोठे यश, विराट ‘या’ स्थानी