भारताच्या वरिष्ठ क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा 4 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. या दौऱ्यापूर्वी इंडिया ए संघ बांगलादेश दौऱ्यावर असून, इंडिया ए आणि बांगलादेश ए या संघांंदरम्यान पहिली अनधिकृत कसोटी कोक्स बाजार येथे सुरू झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवसावर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही भारतीय सलामीवीरांनी शतके झळकावून भारताला मजबूत स्थितीत नेले.
मुख्य संघाचे सामने सुरू होण्यापूर्वी ही अनधिकृत कसोटी आयोजित करण्यात आली होती. पहिल्या दिवशी सौरभ कुमार व नवदीप सैनी यांच्या धारदार गोलंदाजीमुळे इंडिया ए संघाने बांगलादेश ए संघाचा डाव केवळ 112 धावांवर संपवला होता. पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाने बिनबाद 120 धावा बनवल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी खेळायला सुरुवात झाल्यानंतर इंडिया ए संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन व यशस्वी जयस्वाल यांनी भारताचा डाव सुरू केला. या संपूर्ण वर्षात तुफान कामगिरी केलेल्या जयस्वालने हीच कामगिरी कायम राखली. आपल्या इंडिया ए पदार्पणात त्याने शतक साजरे केले. त्या पाठोपाठ अभिमन्यू याने देखील आपले शतक पूर्ण करत भारताला आणखी सुस्थितीत नेले. बाद होण्यापूर्वी यशस्वीने 145 तर अभिमन्यूने 142 धावा बनवल्या. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंडिया ए संघाने तीन बाद 350 अशी मोठी मजल मारली होती.
वरिष्ठ भारतीय खेळाडूंचा हा दौरा 4 डिसेंबरपासून सुरू होईल. या दौऱ्यावर भारतीय संघ सुरुवातीला तीन सामन्यांची वनडे मालिका खेळेल. त्यानंतर 14 डिसेंबरपासून दोन्ही संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सहभागी होतील. विशेष म्हणजे या दौऱ्यावर भारताचे सर्व प्रमुख खेळाडू सहभागी होणार आहेत.
(India A V Bangladesh A Yashasvi Jaiswal Abhimanyu Easwaran Hits Century)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सॅमसनला वगळल्याने शशी थरूर यांची संघ व्यवस्थापनावर आगपाखड; लक्ष्मण-पंतला धरले धारेवर
खळबळजनक! पाकिस्तानात पोहोचलेल्या तब्बल 14 इंग्लिश खेळाडूची बिघडली तब्येत; पहिली कसोटी संकटात