सध्या भारत अ संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. भारत अ आणि दक्षिण अफ्रिका अ संघातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (३ नोव्हेंबर) अनिर्णीत झाला. भारतीय संघाला विजयासाठी २३४ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लक्ष्याचा पाठलाग करताता भारताने ३ विकेट्सच्या नुकासानावर १५५ धावा केल्या होत्या. अशात भारतीय संघ विजयाच्या दिशेने चालला होता, पण नंतर खराब सूर्यप्रकाशामुळे खेळ ठरलेल्या वेळेपेक्षा आधी धांबवण्यात आला. परिणामी सामना अनिर्णीत करण्यात आला.
जर शेवटच्या दिवसाचा संपूर्ण खेळ होऊ शकला असता, तर अजून २० षटकांचा खेळ झाला असता आणि भारताच्या विजयाची शक्यता जास्त होती. भारताला विजयासाठी अजून ७९ धावांची आवश्यकाता होती, पण खराब वातावरणात कसलाच सुधार होऊ शकला नाही आणि सामना अनिर्णीत राहिला.
दुसऱ्या डावात हनुमा विहारीने ११६ चेंडूंमध्ये १२ चौकारांच्या मदतीने ७२ धावा केल्या आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. विहारीने अभिमन्यु ईश्वरननसोबत तिसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी केली. ईश्वरनने ५५ धावांची महत्वाची खेळी केली, तर युवा पृथ्वी शॉने १८ धावांचे योगदान दिले. कर्णधार प्रियांक पांचाल मात्र, दुसऱ्या डावात त्याचे खाते न खोलता बाद झाला.
तत्पूर्वी, या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण अफ्रिका संघाने २९४ धावा केल्या होत्या. त्यानंतर पहिल्या डावात भारताने फलंदाजी करताना २७६ धावा केल्या होत्या. पहिला डाव संपल्यानंतर दक्षिण अफ्रिका संघ आघाडीवर होता. हनुमा विहारीने (५४) पहिल्या डावात देखील अर्धशतकी खेळी केली होती. दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिकाने २१२ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला.
त्यानंतर भारताला सामन्यत विजय मिळवण्यासाठी २३४ धावांचे लक्ष्य मिळाले होते. दुसऱ्या डावात हमुमा विहारी (७२) आणि अभिमन्यु ईश्वरनने (५५) यांनी अर्धशतकी खळी केली. पण खराब सूर्यप्रकासामुळे भारताचे दक्षिण अफ्रिका अ संघावर कसोटीत विजय मिळवण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
अभिमन्यु ईश्वरन बाद झाल्यानंतर लगेचच पांचांनी कमी सूर्यप्रकाशामुळे शेवटच्या दिवसाचा खेळ धांबवण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी भारत अ आणि दक्षिण अफ्रिका अ संघातील पहिला कसोटी सामना देखील अनिर्णीत झाला होता. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना ६ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कडक सॅल्युट! काल ज्या भिंतीवरचा इतिहास वाचत होता, आज त्याच भिंतीवर त्याने स्वतःच नाव कोरलंय
याचि देही याचि डोळा! द्रविड-श्रीनाथने तिसऱ्यांदा अनुभवला ‘परफेक्ट टेन’चा थरार
शानदार… जबरदस्त…! एजाज पटेलने घेतल्या भारताच्या १० विकेट्; कुंबळे, लेकरच्या यादीत सामील