---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१: भारत आणि पाकिस्तान संघांची ‘सार्वकालिन प्लेइंग इलेव्हन’, धोनी संघनायक तर…

On: सोमवार, ऑक्टोबर 18, 2021 1:22 PM
---Advertisement---

यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे. हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने येत असतात त्यावेळी चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळत असतो.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघाची कामगिरी पाहिली तर पाकिस्तान संघाला एकही सामन्यात विजय मिळवण्यात यश आले नाहीये. त्यामुळे पाकिस्तान संघ यंदाच्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी आम्ही तुमच्यासाठी दोन्ही देशातील दिग्गज खेळाडूंची सार्वकालिन प्लेइंग ईलेव्हन घेऊन आलो आहोत.

अशी आहे दिग्गज भारतीय खेळाडूंची सार्वकालिन प्लेइंग ईलेव्हन –
रोहित शर्मा, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक),सुरेश रैना,इरफान पठाण, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, जहीर खान

अशी आहे पाकिस्तानच्या खेळाडूंची सार्वकालिन प्लेइंग ईलेव्हन-
बाबर आजम, कामरान अकमल (यष्टिरक्षक), मोहम्मद हाफिझ, मिसबाह अल हक, शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी (कर्णधार), अब्दुल रज्जाक,सईद अजमल, उमर गुल, मोहम्मद आमिर,सोहेल तन्वीर

भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. हा सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. या दोन्ही संघांची टी-२० विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर, हे दोन्ही संघ आतापर्यंत एकूण ५ वेळेस आमने सामने आले आहेत. या पाचही सामन्यात भारतीय संघाने बाजी मारत विजय मिळवला आहे. यामध्ये २००७ टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा देखील समावेश आहे.

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ 
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव,रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्‍मद शमी.

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चाहर, अक्षर पटेल.

महत्त्वाच्या बातम्या-

आज भिडणार भारत आणि इंग्लंड संघ, प्लेइंग इलेव्हनसहित जाणून घ्या सामन्याबद्दल संपूर्ण माहिती

भारतीय मूळ असलेल्या पठ्ठ्याची पहिल्याच टी२० विश्वचषक सामन्यात नाद खुळा कामगिरी, चोपल्या नाबाद ७३ धावा

‘तळापासून सुरुवात केली, आता इथे आहे’, पृथ्वी शॉने स्वत:लाच गिफ्ट केली बीएमडब्ल्यू कार; पाहा फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---