---Advertisement---

IND vs PAK; काही तासातच रंगणार फायनलचा थरार! कधी आणि कुठे पाहायचा सामना

---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघात आणखी एक रंजक सामना रंगणार आहे. पुरूष कनिष्ठ आशिया चषक 2024चा फायनल सामना बुधवारी (4 डिसेंबर) होणार आहे. हा सामना भारत आणि पाकिस्तान संघात होणार आहे. भारतीय संघ ‘गट अ’ चा भाग होता. त्यांनी 4 सामने खेळले आणि सर्व सामने जिंकले. तर पाकिस्तानचा संघ ‘गट ब’ चा भाग होता. तत्पूर्वी हा सामना कुठे आणि कधी पाहायचा याबद्दल जाणून घेऊया.

भारत विरूद्ध पाकिस्तान (india vs Pakistan) संघातील फायनल सामना आज रात्री 8.30 वाजता होणार आहे. भारतीय संघाने पुरूष ज्युनियर आशिया कप (Asia Cup 2024) मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने जपान, कोरिया, थायलंड आणि चायनीज तैपेईचा पराभव केला. भारतीय संघाने यावेळी स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. आता फायनल फेरीत त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानने देखील एकही सामना गमावला नाही.

पाकिस्तान हॉकी संघाने देखील 4 सामने खेळले आणि सर्व सामन्यात विजय मिळवला. पाकिस्तानने मलेशिया, बांगलादेश, चीन, ओमानचा पराभव केला.

पुरूषांच्या ज्युनियर आशिया चषकात पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. दरम्यान दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होईल. चाहत्यांना हा सामना मोफत पाहता येणार आहे. मात्र यासाठी मोबाईलमध्ये हॉकी इंडिया ॲप डाउनलोड करावे लागेल. यासाठी हॉकी इंडियाने ‘एक्स’ वर एक पोस्टही शेअर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अंडर 19 खेळाडूत दिसली एमएस धोनीची झलक! अप्रतिम ‘नो-लूक’ थ्रो चा व्हिडिओ व्हायरल
पदार्पण करताच नशीब चमकले; 21 वर्षाचा स्टार खेळाडू पहिल्या कसोटीनंतरच केंद्रीय करारात सामील
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी पाकिस्तान संघ जाहीर! बाबरची तिन्ही फाॅरमॅटमध्ये निवड, तर शाहीनला कसोटीतून डच्चू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---