---Advertisement---

हा खेळाडू ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकात टीम इंडियात करणार सरप्राईज एंट्री

---Advertisement---

मंगळवारी(7 जानेवारी) होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात दुसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय (Won by 7 wickets) मिळवत टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या गोलंदाजांची प्रशंसा केली आहे.

या सामन्यात भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) पुनरागमन झाले आहे.

त्याचबरोबर नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) चांगली कामगिरी करताना प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर, शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे विराटने गोलंदाजांची प्रशंसा केली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये (Australia T20 World Cup) टी20 विश्वचषक खेळण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाजांचा समावेश असणे आवश्यक आहे, असे गोलंदाजांची प्रशंसा करताना विराट म्हणाला.

त्याचबरोबर कर्नाटकचा युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचीही (Prasidh Krishna) प्रशंसा करताना विराट म्हणाला की, ऑस्ट्रेलियामधील खेळपट्टी वेगवान आणि स्विंग होणारी असते. तेव्हा तिथे कृष्णासारखा वेगवान गोलंदाज भारतीय संघात असणे फायदेशीर ठरू शकते. यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक होणार आहे.

“मला असे वाटते की एक खेळाडू आश्चर्यकारक ठरू शकतो. प्रसिद्ध क्रिष्णा असा गोलंदाज आहे ज्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे,” असेही विराट यावेळी म्हणाला.

https://twitter.com/Maha_Sports/status/1214813805416308736

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---