---Advertisement---

चहल-पंतने बॉक्सिंग करताना केली ट्रेनरचीच धुलाई, पहा व्हिडिओ

On: रविवार, जानेवारी 5, 2020 2:44 PM
---Advertisement---

रविवारी (5 जानेवारी) गुवाहाटी (Guwahati) येथे भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात 3 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील पहिला सामना (First Match of 3 T20 series) पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू आपल्या तंदुरुस्तीवर (Fitness) काम करत आहेत.

भारतीय संघाचे खेळाडू तंदुरुस्तीवर काम करत असताना रिषभ पंतने (Rishabh Pant) ट्रेनरबरोबर मस्ती करतानाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

यातील पहिल्या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आपल्या ट्रेनर बरोबर जिम सत्रात बॉक्सिंगचा सराव करताना दिसत आहे.

तसेच, दुसऱ्या व्हिडिओमध्ये भारताचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आपल्या ट्रेनर बरोबर जिम सत्रात बॉक्सिंग करताना मस्ती करताना दिसत आहे. यादरम्यान पंत अचानक पाठीमागून येत ट्रेनरला पकडतो आणि चहलला सांगतो की ट्रेनरला मार. यावेळी चहल आपली बॉक्सिंग सोडून पंतबरोबर मस्ती करत ट्रेनरला मारतो.

यावेळी ट्रेनर या दोघांपासून बचाव करण्याचा खूप प्रयत्न करताना दिसत आहे. या तिघांचा मस्ती करतानाचा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---