---Advertisement---

दुखापतग्रस्त शिखर धवन ऐवजी या खेळाडूची झाली टीम इंडियात निवड!

On: बुधवार, डिसेंबर 11, 2019 3:29 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरूद्ध टी20 मालिकेमधून बाहेर पडलेला धवन आता आगामी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळू शकणार नाही.

डावखुरा सलामीवीर फलंदाज धवन त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. धवनला सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत महाराष्ट्र विरुद्ध सुरतमध्ये खेळत असताना डाव्या गुडघ्यावर खोल जखम झाली होती. त्यामुळे त्याला विंडीजविरूद्धच्या टी20 मालिकेमधून बाहेर पडावे लागले आणि आता तो येत्या वनडे मालिकेतूनही बाहेर पडला आहे.

बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, वैद्यकीय टीमला वाटते धवनला अजून गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी थोडा वेळ लागेल.

त्यामुळे आता त्याच्याऐवजी कर्नाटकचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालची वेस्ट इंडिज विरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

अगरवालने गेल्या काही कसोटी सामन्यात भारताकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्याने कसोटीमध्ये दमदार खेळ करताना 9 कसोटी सामन्यातच 2 द्विशतकेही झळकावली. पण त्याच्याकडे कसोटीबरोबरच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जलद धावा करण्याची क्षमता आहे.

बुधवारी टी20 मालिका संपल्यानंतर चेन्नईत 15 डिसेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. यानंतर दुसरा वनडे सामना 18 डिसेंबर रोजी विशाखापट्टणममध्ये आणि त्यानंतर 22 डिसेंबर रोजी तिसरा आणि अंतिम सामना कटक येथे होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---