अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या एएफसी आशियाई करंडक स्पर्धेत भारताला सोमवारी (14 जानेवारी) बहरिन विरुद्ध 1-0 असा पराभव स्विकारावा लागला. यामुळे भारत स्पर्धेबाहेर झाला यानंतर लगेचच भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांनी पदाचा राजीनामा दिला.
बहरिन विरुद्धचा सामना जिंकणे किंवा बरोबरी साधणे भारताला आवश्यक होते. मात्र जमाल रशीदने उशिरा मारलेल्या पेनल्टीनंतर भारताचे सामना बरोबरी करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले.
“मागील चार वर्षामध्ये भारतीय फुटबॉल संघाने चांगली कामगिरी केली आहे. मला या संघाला एशिया कपसाठी पात्र ठरवून द्यायचे होते आणि ते झालेही”, असे स्टीफन म्हणाले.
“मला या खेळाडूंवर अभिमान वाटतो. मला संधी दिल्याबद्दल ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ) आणि स्टाफ यांचे मी आभार मानतो. जय हिंद”, असे स्टीफन यांनी ट्विट केले आहे.
Really proud of our @IndianFootball team achievements over the last 4 years and appreciative of all of the support from the AIFF, the players, our support staff and the wonderful fans. Jai Hind!
— StephenConstantine (@StephenConstan) January 15, 2019
मुळचे इंग्लंडचे असलेल्या स्टीफन यांनी 2015मध्ये दुसऱ्यांदा प्रशिक्षकपदाचा कार्यभार हातात घेतला होता. त्यांनी 2002-05 मध्येही संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती.
ते प्रशिक्षक होण्याआधी भारतीय संघ फिफा क्रमवारीत 173व्या क्रमांकावर होता. त्यानंतर त्यांनी संघाला पहिल्या 100मध्ये स्थान मिळवून दिले. सध्या भारतीय संघ फिफा क्रमवारीत 97व्या स्थानावर आहे.
आशियाई करंडक स्पर्धेत भारताने थायलंडला 4-1 असे पराभूत करत उत्तम सुरूवात केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात अरब विरुद्ध 2-0 असा पराभव स्विकारावा लागला.
Mr. @StephenConstan has announced his resignation as the Head Coach of the Indian National Team. We haven’t received any official communication from him yet but we accept his decision & thank him for his contribution to #Indianfootball: Mr. Kushal Das, General Secretary, AIFF pic.twitter.com/S792tJ6r1h
— Indian Football Team (@IndianFootball) January 14, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी धोनी है! विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे
–सामनावीर विराट कोहलीकडून गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही बरोबरी
–त्या यादीत सचिन, लक्ष्मण, मनीष पांडेसह आता विराटचेही नाव
–एएफसी आशियाई करंडक- भारत स्पर्धेबाहेर, बहरिन विरुद्ध थरारक सामन्यात पराभूत